छत्रपती संभाजीनगर

शिवमहापुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता

CD
ABD26J78612(अँकर) फोटो अंतरवाली टेंभी : येथे पांडुरंग महाराज काळे काल्याचे कीर्तन करताना. ... शिवमहापुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता भक्तिरसात न्हाऊन निघाले अंतरवाली टेंभी; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अंतरवाली टेंभी, ता. ४ (बातमीदार) : येथील श्री हनुमान मंदिर परिसरात समस्त ग्रामस्थ महिला मंडळाच्या वतीने आयोजित भव्य शिवमहापुराण कथा व कीर्तन महोत्सवाची गुरुवारी (ता. तीन) सांगता झाली. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भागवताचार्य पांडुरंग महाराज काळे यांनी मधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे निरूपण केले. भगवान शिवाच्या विविध लीला, महती आणि भक्तीचा संदेश त्यांनी भाविकांना दिला. कथा श्रवणासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महोत्सवात विविध भजनी मंडळे व कीर्तनकारांनी कीर्तनसेवा बजावली. अर्चना रायमल, भक्ती ससाणे, वैष्णवी रायमल, गायत्री ढवळे यांनी कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचार व भक्तीचा संदेश दिला. कीर्तनसेवेलाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महोत्सवात सिंधवादक सतीश महाराज देवठाणकर व तबलावादक डॉ. छबुराव महाराज पवार यांनी साथसंगत केली. त्यांच्या सुरेल वादनामुळे कीर्तन व भजन कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ................ ग्रामस्थांनी घेतला पुढाकार गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत ज्ञानेश्वर महाराज अवघड (शास्त्री) यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता झाली. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काल्याचे कीर्तन व शिवमहापुराण कथेचा लाभ घेतला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक महोत्सवामुळे अंतरवाली टेंभी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त ग्रामस्थ महिला मंडळ व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT