Shiv Senas vehicle rally against the rebels 
छत्रपती संभाजीनगर

बंडखोरांच्या विरोधात शिवसेनेची वाहन फेरी

मदारांची छायाचित्रे असलेले ‘गद्दार’ असे लिहिलेले फलक घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे आमदार व पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन करणाऱ्यांकडून दररोज शक्तिप्रदर्शन केले जात आहे. आज शिवसेनेतर्फे बंडखोर आमदारांविरोधात वाहन फेरी काढली. आमदारांची छायाचित्रे असलेले ‘गद्दार’ असे लिहिलेले फलक घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विशेष म्हणजे, फेरी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांकडे फिरकलीदेखील नाही. शिवसेनेच्या पाच आमदारांनी जिल्ह्यात बंडखोरी केली आहे. त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत शिवसेनेतर्फे मेळावे घेतले जात आहेत. बुधवारी वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वाहन फेरीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली.

वाहन फेरीत बंडखोर आमदारांचे फोटो असलेले फलक व भगवे ध्वज घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT