sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शिवना, सिल्लोडच्या जागेसाठीच बोली ; मालमत्तांच्या लिलावासाठी पुन्हा मुदतवाढ

आदर्श पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. परिणामी, अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले. त्यामुळे सहकार विभागाने पतसंस्थेच्या मालकीच्या जिल्ह्यातील १८ मालमत्ता विक्रीसाठी काढल्या. यासाठी सोमवारी (ता. २९) ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. परिणामी, अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले. त्यामुळे सहकार विभागाने पतसंस्थेच्या मालकीच्या जिल्ह्यातील १८ मालमत्ता विक्रीसाठी काढल्या. यासाठी सोमवारी (ता. २९) ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. दोन वेळा मुदतवाढ देऊन केवळ शिवना आणि सिल्लोड येथील जागा वगळता इतर मालमत्तेसाठी प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा तिसऱ्यांदा १६ मालमत्तेसाठी मुदतवाढ देण्यात आली.

यापूर्वी डिसेंबर महिन्यात ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. सोमवारी केवळ दोन मालमत्तेसाठी खरेदीदार पुढे आले. गेल्या वेळी १८ मालमत्तेची सहकार विभागाने २३ कोटी ७८ लाख २५ हजार रुपये किंमत निश्चित केली होती. प्रतिसाद कमी आला म्हणून त्यात २० टक्के कपात करून ती २० कोटी २६ लाख करण्यात आली. त्यानंतरही प्रतिसाद न आल्याने १६ मालमत्तेसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ द्यावी लागली.

या दोन जागांसाठी लागली बोली

शिवना येथील आदर्श पतसंस्थेच्या शाखेच्या ९०० चौरस फूट क्षेत्रफळासाठी जागेसाठी अर्ज आले. बँकेतर्फे या जागेची किंमत ६५ लाख ४६ हजार लावण्यात आली. यावेळी त्यात २० टक्के कपात करण्यात आली. यासह सिल्लोड येथील सिटी सर्वेच्या हद्दीतील पदमा इमारत विग जी मधील तळ मजल्यावरील दुकान नंबर ३२ व ३३ अशा दोन गाळ्यांसाठी बोली लागली. यासाठी २९.७४ चौरस मीटर गाळ्यासाठी आदर्श पतसंस्थेच्या प्रशासकांनी ३० लाख ५१ हजार रुपयांची किंमत ठरली होती. त्यातही २० टक्के कपात करण्यात आली. या जागांच्या खरेदीसाठी इच्छुक पुढे आले आहेत.

या मालमत्तांचा लिलाव

ठेवीदारांचे साडेतीनशे कोटी रुपये परत देण्यासाठी टप्प्या-टप्प्याने मालमत्ता विक्री करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने होनाजीनगर (हर्सूल) येथील सात मालमत्ता आहेत. यासह कन्नड, पिशोर, नाचनवेल येथील चार मालमत्ता तर आळंद (ता. फुलंब्री) मधील एक, सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द, पळशी, सिल्लोड येथील तीन मालमत्तांचा लिलावात समावेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: घरच्या मैदानावर तरी थालाचं दर्शन होणार? गुजराविरूद्धच्या सामन्यापूर्वी CSK चे कोच काय म्हणाले?

Latur Accident: रुग्णाला नेताना रुग्णवाहिकाच आजारी; रॉड तुटला, भर उन्हात भाजलेल्या रुग्णाच्या वेदनांत भर!

Drowning Incident: खडकीत आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना, सरपण आणायला गेले अन् तिघांचा जीव गेला..

Kolhapur Accident News : डंपर पंक्चर झाला म्हणून थांबला अन्, जिवावर बेतला; समोर जळत होता पण...

Latest Marathi News Live Update: हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

SCROLL FOR NEXT