Ghrishneshwar Jyotirling Verul 
छत्रपती संभाजीनगर

बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात यंदा भाविकांविना महाशिवरात्री साजरी, यात्रा रद्द झाल्याने सर्वत्र शुकशुकाट

देवदत्त कोठारे

खुलताबाद (जि.औरंगाबाद) : वेरुळ (ता.खुलताबाद) येथील १२ वे ज्योतिर्लिंग कोरोना स्थितीमुळं बंदच असल्याने गुरुवारी (ता.११) भाविकाविनाच महाशिवरात्री साजरी झाली. महाशिवरात्रीच्या पर्वकाळात वेरुळ येथे भरणारी यात्राच रद्द झाल्याने वेरुळमध्ये शुकशुकाटच होता. वेरुळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग हे यात्रा पुरण करणारे ज्योतिर्लिंग असुन महाशिवरात्रीच्या पर्वकाळात भाविक लाखोच्या संख्येने वेरुळमध्ये येतात. यंदा मात्र महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन पातळीवर १० ते १३ असे चार दिवस मंदिरच बंद ठेवण्यात आले असून यात्राही रद्द करण्यात आली आहे. या ठिकाणी भाविकांनी येऊ नये म्हणुन कटक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

वेरुळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री.घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी (ता.११) पहाटे पाचच्या दरम्यान मुख्य पुजारी रविंद्र पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करण्यात आली. यावेळी घृष्णेश्वराचे लिंग आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. यंदा गर्भगृहात ना गर्दी होती ना हर हर महादेवचा गजर सालाबादाप्रमाणे घृष्णेश्वर मंदिर ते शिवालय तीर्थ निघणारी पालखी मिरवणुक यंदा मंदिरा बाहेरील परिसरातच काढण्यात आली असल्याचे मंदिर विश्वस्त समिती अध्यक्ष शशांक टोपरे यांनी कळविले.

तसेच रात्री १२ वाजता शासकीय महापूजा होणार असल्याचं कळविले. मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करु नये. म्हणुन चोख पोलिस बंदोबस्ता बरोबरच मंदिर विश्वस्त समितीचे योगेश विटखेडे, चंद्रशेखर शेवाळे, सुनिल जोशी, रेखा सुरेश ठाकरे, संजय जोशी हे लक्ष ठेवून होते. वेरुळ येथे महाशिवरात्रीनिमित्त सालाबादाप्रमाणे याञा भरते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा विविध दुकाने, उपहारगृह, फिरती सिनेमागृह यामुळे वेरुळ नगरीत साधारण तीन दिवस उत्साही अन् उत्सवी वातावरण असते. यंदा मात्र आहे ती नीरव शांतता. या यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडाळासह विविध दुकाने, उपहारगृहे, सिनेमागृह यांच्या माध्यमातुन होणारी लाखोची उलाढाल ठप्प झाली. त्याच वेळी ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्नही बुडाले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT