0balasaheb_thakre1_0.jpg
0balasaheb_thakre1_0.jpg 
छत्रपती संभाजीनगर

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा, निविदा निघाली  

माधव इतबारे

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चार वर्षांपासून रखडलेली निविदा महापालिकेने अखेर प्रसिद्ध केली. निविदा दाखल करण्यासाठी सहा नोव्हेंबरचा वेळ देण्यात आला असून, १० नोव्हेंबरला ती उघडली जाईल. २९ ऑक्टोबरला इच्छुकांची प्री-बिड बैठक बोलावण्यात आली आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व स्मृतिवन विकासित करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ३१ ऑगस्ट २०१६ ला घेण्यात आला होता. सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानातील सात हेक्टर क्षेत्रांवर हे स्मारक उभारले जाणार आहे. मात्र, या उद्यानातील झाडे तोडण्यावरून वाद झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात नियोजित जागेची पाहणी केली व एकही झाड न तोडता स्मारक उभारण्याची ग्वाही दिली.

त्यानुसार नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला. वास्तुविशारद ऑर्कहोम यांनी स्मारक उभारण्यासाठी २५.४९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर २५.४९ कोटींच्या निविदेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. दरम्यान, महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. १३ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर २०२० दरम्यान निविदा स्वीकारण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबरला इच्छुकांची प्री-बिडची बैठक घेतली जाणार आहे. निविदेची तांत्रिक बिड १० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता उघडण्यात येईल. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT