Chandrakant Khaire
Chandrakant Khaire Sakal
छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेची अस्तित्वाची लढाई; कोर्टाच्या निकालाआधी खैरेंकडून यज्ञाचं आयोजन

दत्ता लवांडे

औरंगाबाद : शिवसेनेमध्ये सध्या उभी फूट पडली असून सेनेसाठी आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. दरम्यान, ४० आमदारांनी सेनेशी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आमदारांसोबत शिवसेनेचे डझनपेक्षा जास्त खासदारही एकनाथ शिंदे गटात जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच माजी नेत्यांनीही नाराजी व्यक्त करत शिवसनेला सोडचिठ्ठी दिली आहे.

(Shivsena Former MP Chandrakant Khaire)

शिवसेनेवर मोठं संकट कोसळलं असून उद्या कोर्टात शिवसेनेच्या अस्तित्वाची सुनावणी होणार आहे. याआधी हा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागावा यासाठी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दौलताबाद येथे यज्ञाचं आयोजन केलं आहे.

उद्या सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि शिंदे गटातील वादावर सुनावणी होणार आहे. हा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी खैरे यांनी दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात माजी खासदार चंद्रकांच खैरे यांच्याकडून महापूजा आणि यज्ञ केलं जात आहे. यावेळी शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित होते. शिवसनेवरूल संकट टळावं आणि निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी हा यज्ञ करण्याच येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, शिंदे आणि ठाकरे यांच्यातील शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार असून काल शिंदे गटाने नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावेळी शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवसेनेकडून हकालपट्टी झालेल्या रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान काल रामदास कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिंदे गटाला सामील झाले आहेत.

त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक खासदार शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. काल शिंदे गटाच्या बैठकीत शिवसेनेचे तब्बल १४ आमदार ऑनलाईन उपस्थिती लावली होती. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुणे अपघातातील आरोपींच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर...

Video: 'सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्ती पोहोचला EVM ठेवलेल्या ठिकाणी'; निलेश लंकेंनी व्हिडिओ ट्वीट केल्याने खळबळ

USE vs BAN 1st T20I : अमेरिकेने बांगलादेशला चारली पराभवाची धूळ अन् रचला इतिहास

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Latest Marathi News Live Update: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर

SCROLL FOR NEXT