अवैध वाळू उपसा
अवैध वाळू उपसा sakal
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! खड्ड्यात पडून चार मुलांचा मृत्यू, अवैध वाळूचे बळी सुरुच

सकाळ वृत्तसेवा

बीड/गेवराई : अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या माफियांना पाठीशी घालण्याच्या प्रकाराने गेवराई तालुक्यात बळीचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. सहा) सायंकाळी सहा वाजता घडली. यामुळे वाळूमाफियांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरुद्ध विरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गणेश बाबू इनकर (वय आठ), आकाश राम सोनवणे (वय १०), बबलू गुणाजी वक्ते (वय ११, तिघेही रा. शहाजनपूर चकला) व अमोल संजय कोळेकर (रा. तांदळवाडी, ता. बीड) अशी मृत मुलांची नावे आहेत.

शहाजानपूर व तांदळवाडी ही गावे जवळजवळ आहेत. दोन्ही गावचे लोक नदीपात्रातून ये-जा करतात. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता हे चौघेही नदीपात्रात आले. काठावर बूट, चपला सोडून ते अमोल कोळेकर यास तांदळवाडीला जाण्यासाठी नदीपात्र ओलांडत होते. दरम्यान, नदीपात्रात ठिकठिकाणी अवैध वाळू उपसा केल्याने खड्डे पडलेले आहेत. पाण्यातून वाट काढताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ एक असे चौघेही बुडाले. घटनास्थळी सहायक निरीक्षक संदीप काळे व मादळमोही चौकी पोलिसांनी धाव घेतली.

अशी आली घटना उघडकीस

रात्री सात वाजेनंतरही मुले घरी न परतल्याने कुटुंबीयांनी एकमेकांकडे विचारपूस करत शोधाशोध सुरू केली. तेव्हा काही जणांनी ते उसाच्या शेताजवळून नदीपात्राकडे गेले होते, अशी माहिती दिली. नदीच्या काठावर चपला व बूट आढळल्याने सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नदीपात्रात गावातील तरुणांनी शोध सुरू केला तेव्हा चौघेही एका खड्ड्यात बुडालेले आढळले. अमोल कोळेकर तांदळवाडीहून शहाजनपूरला आला होता, त्यास सोडण्यासाठी ते जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. एकाचवेळी चार निरागस मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला.

कारवायांचे नाटक अन् माफियांना पाठबळ

तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक सर्रास सुरू आहे. माफियांना स्थानिक प्रशासनाचे पाठबळ असल्याशिवाय त्यांची एवढी मुजोरी अशक्य आहे. यापूर्वीही अवैध वाळू उपशामुळे बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जरी वरवरच्या कारवाया होत असल्या तरी माफियांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचे उघड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाला लागली आग, तब्बल ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच

Lok Sabha Election: '...तर ४०० जागा आल्यास ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर उभारले जाईल', मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

IPL 2024 Playoff Race : दिल्लीच्या विजयाने प्लेऑफचे बदलले समीकरण! लखनौचा खेळ खल्लास... 3 मध्ये चुरशीची लढत...

Loksabha Election : हरियाना काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली ; परिस्थिती अनुकूल, तरीही कुरघोडीचे राजकारण रंगले

Punjabi Aloo Paratha : नाश्त्याला बनवा पंजाबी स्टाईल बटाट्याचा पराठा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT