sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : नेमबाज संभाजी झणझणने साधले अचूक ‘लक्ष्य’ ; ११ वर्षांत ६५ पदके, १८ व्या वर्षी बनला टीसी

नेमबाज संभाजी झणझणने साधले अचूक ‘लक्ष्य’

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नेमबाजी हा त्याच्यासाठी जीव की प्राण. शालेय जीवनापासून त्याने प्रिस्टल नेमबाजी प्रकारात चुनूक दाखविली व ११ वर्षांत तब्बल ६५ मेडलला गवसणी घातली. त्याच्या या कार्याची दखल घेत रेल्वेने वयाच्या अठराव्या वर्षी त्याला तिकीट कलेक्टर म्हणून नियुक्ती दिली.

छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी शिवाजी झणझण यांची झेप विद्यार्थ्यांसह तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. वडील महापालिकेत मुख्य अग्निशमन अधिकारी असल्याने वडिलांप्रमाणेच साहसी काम करण्याची प्रेरणा संभाजीला घरातून मिळाली. खेळण्यातील डिजिटल प्रीस्टल घेऊन लहानाचा मोठा झालेल्या संभाजीने वयाच्या १२ व्यावर्षी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पहिले मेडल मिळविले. त्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची कामगिरी चमकदारच राहिली.

रेल्वेच्या शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत त्याने तब्बल सात सुवर्णपदक पटकावले.

रेल्वेने घेतली दखल

रेल्वेने वयाच्या १८ वर्षी त्याला तिकीट कलेक्टर पदावर नियुक्ती दिली. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर १०, राज्यस्तरावर ३२, रेल्वे विभागाची सात यासह तब्बल ६५ मेडेल आत्तापर्यंत मिळविली आहेत; तसेच ३७ प्रमाणपत्र त्याच्याकडे आहेत. सध्या तो बालेवाडी येथे प्रशिक्षण घेत आहे. छत्रपती संभाजीनगरातील सुंदर घाटे, नाशिक येथील डॉ. भिष्मराज बाम, मोनाली गोरे, बीडचा नेमबाज नवनाथ फडतारे, पुणे येथील अक्षय अष्टपुत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT