Shortage of Urea Fertilizer in Aurangabad District
Shortage of Urea Fertilizer in Aurangabad District 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांची व्यथा : उपाशीपोटी रांगेत थांबूनही मिळेना खत, गर्दीमुळे कोरोनालाही आमंत्रण

दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव (जि. औरंगाबाद)  : कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी शासनाने थेट शेतकऱ्‍यांच्या बांधावर खत पोचविण्याची योजना सुरू केली. पण, ही योजना कागदावरच असून, येथील सर्वच कृषी सेवा केंद्रावर एकाच वेळी शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांची युरिया खतासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे दुकानांसमोर रांगा दिसत आहेत. मंगळवारी (ता. सात) तर
पोलिस बंदोबस्तात विक्रेत्यांना खत विकावे लागले. 

सध्या शेतकऱ्यांसमोर खत टंचाईचे संकट आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळातही शेतकरी घराबाहेर पडून खत खरेदीसाठी जात आहेत. पण, कृषी केंद्रात गर्दी होत असल्याने सुरक्षित अंतराचा नियम पाळला जात नसल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीत पाऊस चांगला पडत असल्याने पीक बहरात आहे. मात्र, आता त्यासाठी पोषक असणारे युरिया खतच भेटत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

सध्या पिकाच्या वाढीसाठी रासायनिक खत टाकणे आवश्यक आहे. अशात युरिया टंचाई निर्माण झाल्याने या पिकांना खताची मात्रा देण्याला उशीर होत आहे. शासनाची बांधावर खत ही योजना कागदावर असल्याचे चित्र आहे आहे. येथील कृषी सेवा केंद्र उघडण्यापूर्वीच शेतकरी सकाळी-सकाळी येऊन रांगा लावत आहेत. दरम्यान, पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना खाताची विक्री केली जात आहे. 

...म्हणून आम्ही गलवान खोऱ्यातून माघार घेतोय; चीनने दिली कबुली
  
उपाशी पोटी चक्करा 
खत मिळावे, यासाठी अनेक शेतकरी रोज उपाशी पोटी चक्करा टाकत आहेत. त्यातच कोरोनाचीही भीती आहे. पण, टंचाई असल्याने अनेकांना खताविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 
 
‘सकाळ’च्या व्हिडिओची दखल 
युरियाची टंचाई निर्माण झाल्याचा व्हिडिओ ‘सकाळ’च्या फेसबूक पेजवर प्रसारित करण्यात आला होता. या व्हिडिओची दखल घेत तालुका कृषी अधिकारी सुदर्शन मामडेवार यांनी तत्काळ चाळीस टन युरियाचा साठा येथील संतोष कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध करून दिला. मात्र, मागणीच्या तुलनेत तो कमी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT