छत्रपती संभाजीनगर

श्री अष्टभुजा देवी मंदिर

CD
फोटोसह ------------ श्री अष्टभुजा देवी, परभणी परभणी ः श्री अष्टभुजा देवी मंदिरात रविवार (ता.११) विधिवत घटस्थापना करण्यात आली. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवात रोज पहाटे पाचला देवीची पूजा, सकाळी सातला आरती, तर सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत सप्तशती पाठ व हवन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत हवन व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवात शतचंडी हवन हे विशेष आकर्षण असणार आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्री अष्टभुजा देवी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, सचिव किशनराव झाडे, उपाध्यक्ष रामकृष्ण शहाणे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव शहाणे, सहसचिव नीलिमा गुप्ता, विश्वस्त संतोष अग्रवाल व शिवाजी विभुते यांच्यासह श्री अष्टभुजा देवी मंदिर युवा संघटनेचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT