छत्रपती संभाजीनगर

''श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या प्रबोधन, लेझीम लोककलेचा सन्मान

CD
श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या प्रबोधन, लेझीम लोककलेचा सन्मान संस्कृती मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १९ ः गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या ६२ ते ६४ वर्षांच्या प्रदीर्घ सामाजिक, सांस्कृतिक व लोककलेच्या योगदानाची दखल घेत, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव राज्य महोत्सवात तालुका व जिल्हा पातळीवरील प्रथम मानाचा पुरस्कार देऊन मंडळाचा गौरव करण्यात आला. मुंबई येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात धाराशिवचे हे मंडळ विशेष आकर्षण ठरले. पांढरा नेहरू शर्ट, पांढरी पॅन्ट, भगवे फेटे आणि भगवे शेले अशा पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात ४० गणेश दूतांच्या शिस्तबद्ध उपस्थितीने संपूर्ण वातावरण गणपती बाप्पा मोरया, जय भवानी जय शिवाजी आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषाने दुमदुमून गेले. सोहळ्यात संयोजकांनी मंडळाच्या ६२ वर्षांच्या या शिस्तबद्ध परंपरेचे आणि एकजुटीचे विशेष कौतुक केले. दरवर्षी एका विशिष्ट ध्येयाने आणि संकल्पनेने कार्य करणाऱ्या या मंडळाने यंदा व्यसनमुक्त युवक व नशामुक्त भारत हा संदेश दिला. यापूर्वी ऑपरेशन सिंदूर, मराठी भाषेचा अभिजात दर्जा, डिजिटल युग-भ्रष्टाचार मुक्ती, कोरोना मुक्त महाराष्ट्र आणि कारगिल विजय यासारख्या विषयांवरून मंडळाने सातत्याने समाजप्रबोधन केले. महापूर, भूकंप असो की कोरोनाचे संकट; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सातत्याने मदत पाठवण्याची परंपरा मंडळाने आजही कायम ठेवली आहे. मतिमंद, मूकबधिर, अपंग व निराधार मुलींना आर्थिक मदत तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. शासकीय महिला रुग्णालयात मुलगी जन्माला आल्यास बालिका जन्मोत्सव साजरा करणे, स्त्रीभ्रूणहत्या व बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन आणि जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याचे कार्य मंडळाने केले. डीजेला फाटा देत, हलगी, ढोल-ताशा, संबळ आणि बुलबुलच्या तालावर मुला-मुलींच्या लेझीम पथकाने लोककला जिवंत ठेवली आहे. ...... धाराशिव ः जिल्हा पातळीवरील प्रथम मानाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थित श्री बाल हनुमान गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते. फोटो ःOSM26B07239

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale : येरवडा म्हाडा कॉलनी पुनर्विकासावर तोडगा काढू; रामदार आठवले यांचे आश्वासन

Exemption From Examination Fees : दुष्काळग्रस्त २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; पुणे विद्यापीठातील ६५ हजार विद्यार्थ्यांनी केले अर्ज

Latest Marathi News Live Update : बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे निधन

Gokul Election Hasan Mushrif Reaction : गोकुळचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया; महायुतीतील भांडणांवर भाष्य; ‘आम्ही निकाल स्वीकारला’

मुंबई ते राजस्थान, व्हाया सुरत! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपी मुंबईतून कसे पसार झाले? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT