छत्रपती संभाजीनगर

श्री शंभुराजे गणेश मंडळातर्फे रक्तदात्यांचा ५ लाखाचा विमा

CD
LTR19HTP04.jpg लातूर ः येथील मोतीनगर भागातील श्री शंभुराजे गणेश मंडळाचा जगन्नाथपुरीचा देखावा. ---- श्री शंभुराजे गणेश मंडळातर्फे रक्तदात्यांचा ५ लाखाचा विमा ---- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १९ ः येथील मोतीनगर भागातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील श्री शंभुराजे गणेश मंडळ हे सामाजिक उपक्रमात सातत्याने अग्रेसर राहिले आहे. यावर्षी या मंडळाच्या वतीने रक्तदान करणाऱ्यांना हेल्मेटसोबतच पाच लाखाचे विमा कवच देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आनंद मालू यांनी दिली. येथे सामाजिक कार्यकर्ते निलेश ठक्कर, नामदेव चाळक, दिवंगत श्रीरंग झंवर यांनी ३९ वर्षांपूर्वी श्री शंभुराजे गणेश मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या वतीने सातत्याने उपक्रम राबवले जात आहेत. या वर्षी भाविक भक्त्तांसाठी श्री जगन्नाथपूरीचा दर्शनाचा देखावा करण्यात आला आहे. व मंडळातर्फे मंगळवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदात्याला मंडळातर्फे पाच लाख रूपयाचे अपघाती विमाकवच तसेच हेल्मेट भेट दिले जाणार आहे. सदरील कार्यक्रमासाठी पोलिस अधिक्षक अमोल तांबे, महापौर जयश्री सोनकांबळे व माहेश्वरीचे अध्यक्ष प्रकाश कासट उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (ता. २३) सकाळी महाप्रसाद होणार आहे. तरी, परिसरातील नागरिकांनी रक्तदान करून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष आनंद मालू, सचिव संपत बंग व पदाधिकारी अरूण सुर्यवंशी, विश्वनाथ डोणगापुरे, अक्षय चाळक, दिलीप दायमा, मनोज झंवर, खंडु जगताप, सोमनाथ अग्रे, सागर चाळक, अभिजीत गायकवाड, बलभीम हाडोळे, अशोक भंडारी, निळकंठ आलुरे, मनोज भंडारी, ॲड. संतोष सोनी व भैरवनाथ कदम यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT