Six killed four injured in Marathwada due to lightning monsoon rain weather Sakal
छत्रपती संभाजीनगर

Lightning Death : मराठवाड्यात वीज पडून सहा ठार, चारजण गंभीर

वीज पडल्याच्या घटनांत नऊ जनावरे दगावली

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यांत शुक्रवारी वेगवेगळ्या घटनांत वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतांत माय-लेकीचा समावेश आहे. दरम्यान, वीज पडल्याच्या घटनांत नऊ जनावरे दगावली. गंगाखेड तालुक्यातील (जि. परभणी) डोंगरपिंपळा येथे दुपारी चारच्या सुमारास वीज पडल्याने सविता विठ्ठल कतारे (वय ४०) व निकिता विठ्ठल कतारे (१८) या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला.

याच तालुक्यातील भेंडेवाडी येथे अशाच घटनेत ओंकार किशन घुगे (१४) याचा जागीच मृत्यू झाला. गोविंद विनायक घुगे (३०), सुनीता काशीनाथ शेप (४८), रेणुका काशीनाथ शेप (२७) हे गंभीर जखमी झाले.

एकंबा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील शांताबाई पुंजाराम खंदारे (५०) या शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हिमायतनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

बोधडी मंडळातील नागसवाडी (ता. किनवट, जि. नांदेड) येथे दुपारी वीज पडून साईनाथ दत्ता घुगे (२५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी वैष्णवी साईनाथ घुगे (२२) जखमी झाल्या. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोनीमोहा (ता. किल्लेधारूर, जि. बीड) शिवारात वीज पडून संगीता मच्छिंद्र कराड (४८, रा.डुकडेगाव, ह.मु. सोनीमोहा) यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र कराड हे शेतात गुरे चारत होते. त्यांची पत्नी संगीता या शेतात काम करीत होत्या. पाऊस सुरू झाल्याने त्या झाडाखाली थांबल्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली. त्यांच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे.

सहा जनावरांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वीज कोसळल्याने कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातील सहा जनावरांचा मृत्यू झाला. तहसीलदारांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. फुलंब्री तालुक्याच्या पाथ्रीमधील आबाराव पाथ्रीकर यांच्या गोठ्यावर वीज कोसळली.

यात गोठ्यातील दोन गायींचा मृत्यू झाला. तर कन्नड तालुक्याच्या पळशीतील प्रवीण जाधव यांच्या बैलाचा शेतात वीज पडून मृत्यू झाला. तसेच सिल्लोड तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडली. मंगरुळमधील गट क्रमांक ३२० मध्ये वीज पडल्याने विठ्ठल भगाजी ढगे यांची एक गाय तर मोंढा गावातील राजू सीताराम बगळे यांचे दोन बैल जागीच ठार झाले.

तीन गायी दगावल्या

भोकर ः जांभळी (ता.भोकर) येथील शिवारात गुरुवारी (ता.२८) वीज पडून तीन गायी दगावल्या. तालुक्यात गत आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. गुरुवारी दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी जांभळी येथील शेतकरी सुदाम हरी आडे यांच्या मालकीच्या तीन गायी वीज पडून दगावल्या.

बैलगाडी वाहून गेल्याने शेतमजुराचा मृत्यू

कळमनुरी ः ओढ्यास आलेल्या पुरामध्ये बैलगाडी वाहून गेल्याने मजुराचा मृत्यू झाला. तर, दोन बैल व एक म्हैस दगावली असून, एक म्हैस वाहून गेली आहे. सालेगाव (ता.कळमनुरी) परिसरात घडली. भीमराव धुळे (वय ६०) असे मृत मजुराचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT