अटक 
छत्रपती संभाजीनगर

पंचायत समिती उपसभापती शेळके मारहाण प्रकरणी सहा जणांना अटक

अनिल जमधडे

औरंगाबाद : औरंगाबाद पंचायत समितीचे (Aurangabad Panchayat Samiti) उपसभापती अर्जुन शेळके यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात पंचायत समितीचे काँग्रेस (Congress) सदस्य अनुराग शिंदे, विजय जाधव, शिवसेना पदाधिकारी मंगेश जाधव यांच्यासह एकूण सहा जणांना गुरुवारी (ता. पाच) सिटी चौक पोलिसांनी अटक केली. पंचायत समितीचे नवनियुक्त उपसभापती अर्जुन शेळके (Crime In Aurangabad) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, शेळके हे ता.२ ऑगस्ट रोजी दुपारी दालनात काम करत होते. त्यावेळी काँग्रेस सदस्य अनुराग शिंदे, विजय जाधव हे साथीदारांसह दालनात आले. शिंदे यांनी माझ्याविरुद्ध उपसभापतीपदाच्या निवडणुकीत का उभा राहिला, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली.

तसेच जाधव व इतर त्यांच्या साथीदारांनीही दालनातील शासकीय खुर्च्या अंगावर व डोक्यात फेकून मारल्या. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचे उपसभापती शेळके यांनी तक्रारीत नमूद केले. दरम्यान, या मारहाण प्रकरणी पोलिसांनी अनुराग शिंदे, विजय जाधव, मंगेश जाधव, गौतम उबाळे, उल्हास देशमुख, जाफर बहाद्दूर खान पठाण या सहा जणांना अटक केली. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT