राष्ट्रीय स्केटिंगपटू अभिषेक लोमटे 
छत्रपती संभाजीनगर

पाठीवर टायर बांधून पळायचा,स्केटिंगपटू अभिषेकची सोशल मीडियावर धूम

अतुल पाटील -सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : क्रीडा संकुलावर फिरायला जायचो. त्यावेळी तिथे येणाऱ्या खेळाडूंकडे बघून आपणही स्केटिंग करावे, असा मोह झाला. त्यानंतर याबाबत घरी सांगितले. तुला आवडत असेल तर स्केटिंग कर, असे घरी सांगितले. मग प्रशिक्षक भिकन आंबे यांना भेटलो. वयाच्या १२ व्या वर्षी स्केटिंगला सुरवात केली. स्केटिंग करायचे तर, सुरवातीला साधेपणानेच सराव करण्याचा सल्ला प्रशिक्षकांनी दिला. सहा - सात महिन्यानंतर एक स्पर्धा झाली, त्यात मी पहिला आलो आणि हेच यश मला राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेले, असे राष्ट्रीय स्केटिंगपटू अभिषेक लोमटे (Skating Player Abhishek Lomte) याने सांगितले. आ. कृ. वाघमारे शाळेत असताना पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाला. त्यानंतर यात रस निर्माण होत गेला. शाळा आणि खेळाची आवड जोपासताना मोठी कसरत करावी लागली. अभिषेक सांगतो, पाच वाजेपर्यंत शाळा असायची. त्यानंतर (Aurangabad) अर्ध्या तासातच तयार होत. मैदानावर जायचो. तीन तास त्याठिकाणी सराव करायचो. रनींग, वॉर्मअप करत होतो. पाठीवर मोठे १८-२० किलोचे टायर बांधून मैदानावर राऊंड मारायला लावायचे.

हा सराव तब्बल सहा वर्षे सुरुच होता. कोरोना काळात मैदानातला सराव थांबला असला तरी, जमेल तसे जमेल तिथे सराव सुरुच आहे. स्पर्धेनिमित्त पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नागपुरला गेलो होतो. त्यावेळी बहिणीला सोबत घेऊन गेलो. त्यानंतर अनेक स्पर्धांवेळी तिलाच सोबत घेऊन जात होता. पहिल्यांदा जेव्हा राज्यस्तरीय पदक जिंकले त्यावेळी आमच्या प्रशिक्षकांना फोन केला. त्यानंतर आई वडिलांना फोन केला. मला आनंद होताच पण, हे दोन्ही मार्गदर्शक पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत होते. राज्यस्तरावर स्पर्धा जिंकल्यानंतर लोक ओळखायला लागले. त्यांच्यानंतर सहा महिन्यातच राष्ट्रीय स्पर्धात सहभागी होण्याची संधी मिळाली. स्केटिंगमध्ये कॉर्ड, फॅन्सी इनलाईन आणि प्रोफेशनल इनलाईन हे तीन प्रकार आहेत. सुरवातीच्या काळात कॉर्डमध्ये सराव केला.

यातून केवळ मनोरंजनाचा हेतू होता. त्यानंतर फॅन्सी इनलाईन या प्रकारातही सराव केला. मात्र, या खेळात आवड निर्माण झाल्यानंतर यातील अवघड समजल्या जाणाऱ्या प्रोफेशनल इनलाईन या प्रकारात अभिषेकने जम बसवला. अभिषेककडे सध्या तीन राष्ट्रीय तर, नऊ राज्यस्तरीय पदके आहेत. खासगी संस्थांतर्फे आयोजित स्पर्धातील एकुण ३०-३५ पदके पटकावली आहेत. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात सध्या तिसऱ्या वर्षात अभिषेक शिकत आहे. स्केटिंगशिवाय सायकलिंग आणि धावण्याचा देखील छंद आहे. यातही प्राविण्य मिळवले. स्केटिंगमुळेच त्याची आता सोशल मीडियात ओळखत आहे. ‘इन्स्टा’वर तर त्याचे चार वर्षात ६३ हजार फॉलोअर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT