विद्यार्थ्यांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्याचे धडे
-----
बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात अनोखा उपक्रम; कार्यशाळेत ३६५ विद्यार्थी सहभागी
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३ : एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिप्लोमा विभागातर्फे टाटा स्ट्रिवद्वारे चालविण्यात येणाऱ्या बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम सर्टिफिकेशनचे तीन दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेमध्ये व्यक्तिमत्त्व विकास आणि इंडस्ट्रीमध्ये आवश्यक कौशल्याचे धडे देण्यात आले.
या प्रशिक्षणात डिप्लोमा विभागाच्या विद्यार्थ्यांना टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स काय आहे आणि त्याचे इंडस्ट्रीमध्ये किती महत्त्व आहे हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगण्यात आले. या कार्यशाळेमध्ये व्यक्तिमत्त्व विकास आणि इंडस्ट्रीमध्ये लागणारे स्किल्स विद्यार्थ्यांना या तीन दिवसांमध्ये शिकवण्यात आले. या कार्यशाळेचा डिप्लोमा द्वितीय वर्षाच्या ३६५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
याप्रसंगी टाटा स्टीलतर्फे श्रीपाद कुलकर्णी आणि सलीम पठाण यांनी प्रशिक्षण दिले. याचे आयोजन डिप्लोमा विभाग प्रभारी डॉ. अस्मिता देशपांडे तसेच समन्वयक प्रा. रवींद्र रंदाळे, प्रा. ईशा सुडके, प्रा. अनुजा एडवे, प्रा. कपिल धप्पाधुळे, प्रा. श्रेयश शेटे, प्रा. नीरज प्रयाग यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे, उपप्राचार्य वीरभद्र बाळे तसेच निबंधक डॉ.ज्योती पाटील यांनीही या उपक्रमाचे व संबंधित प्राध्यापकांचे अभिनंदन केले. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील चिंचोलीकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजय रेवडकर यांनी प्राध्यापकांचे कौतुक केले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.