Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

फक्त एक इंचाचे दुर्मिळ कुराण शरीफ! वाचण्यासाठी करावा लागतो भिंगाचा वापर

अब्दुल हादी यांच्याकडे दोनशे वर्षांपेक्षा जास्त जुन्या कुराण शरीफच्या प्रतींचा संग्रह

शेखलाल शेख

औरंगाबाद: रमजानचा महिना (Ramadan) हा ‘बरकतों का’ महिना असल्याने महिनाभर कुराण शरीफच्या पठणाला अतिशय महत्त्व असते. तसेच विशेष नमाज तरावीहमध्ये संपूर्ण कुराणाचे पठण केले जाते. प्रत्येक मुस्लिम कुटुंबात कुराण शरीफच्या प्रती हमखास असतातच. अशीच अतिशय दुर्मिळ आणि फक्त एक इंचाची कुराण शरीफची (quran sharif) प्रत शहरातील अब्दुल हादी यांच्याकडे आहे. हे कुराण वाचण्यासाठी चक्क भिंगाचा वापर करावा लागतो. ही कुराण शरीफची प्रत दीडशे ते दोनशे वर्षे जुनी आहे. तसेच त्यांच्याकडे आणखी पाच इंचाचे २०० वर्षांपेक्षा जास्त आणि एक ११७ वर्षे जुने कुराण शरीफ संग्रही आहे.

पिढ्यान् पिढ्या कुराण शरीफचे जतन-

कुराण शरीफचा संदेश जगातील सर्वांसाठी आहे. पाचवेळची नमाज तसेच विशेष नमाज तरावीहमध्ये कुराण शरीफचे पठण केले जाते. मात्र यावर्षी लॉकडाउनमुळे पाचवेळची नमाज घरातच अदा करावी लागत आहे. अब्दुल हादी यांच्याकडील फक्त १ इंचाचे कुराण शरीफ अतिशय दुर्मिळ आहे. अब्दुल हादी यांचे वडील अब्दुल हई यांनी ही प्रत जपून ठेवली. अब्दुल हई यांना ही प्रत त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती.

इजिप्तमधील २०० वर्षांपेक्षा जास्त जुने कुराण शरीफ-

अब्दुल हादी यांच्याकडे इजिप्तमधील दोनशे वर्षे जुनी कुराण शरीफचीही प्रत आहे. हे कुराण शरीफ फक्त पाच इंचाचे आहे. यावर हे कुराण शरीफ इजिप्तमधील असल्याचा उल्लेख आहे. यामध्ये किताबत पद्धतीने कुराण शरीफमधील आयात आहेत.

११७ वर्षे जुने कुराण शरीफ-

मौलवी हाफीज नजीर अहेमद यांनी १९०३ मध्ये उर्दूतून कुराण शरीफची भाषांतर केलेली प्रत आहे. एका पानावर मूळ कुराण शरीफच्या अरबीतील आयात आहे तर बाजूच्या पानावर त्याची उर्दूतून माहिती देण्यात आलेली आहे. हे कुराण शरीफसुद्धा अतिशय दुर्मिळ आहे.

माझे वडील अब्दुल हई यांच्याकडील ही दुर्मिळ पुस्तके आहेत. त्यांच्या निधनानंतर मी सांभाळली. अनेक जण आमच्या सेंटरमधील दुर्मिळ पुस्तके संदर्भासाठी वापरतात. आमच्याकडील कुराण शरीफच्या प्रती आम्ही पिढ्यान् पिढ्या जपून ठेवल्या आहेत.

-अब्दुल हादी, संचालक, अब्दुल हई रिसर्च सेंटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT