BMH26A09828
फोटो ओळी -
भूम ः महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, सूर्यकांत कांबळे व इतर.
भूममध्ये सायकली, ५६ पैठणींचे वाटप
भूम : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भूम-परंडा-वाशी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अक्षय बर्वे यांच्या पुढाकारातून गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना ५६ सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी या सायकलींची मदत होणार आहे. या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद मिळाला. तर महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांसाठी सोन्याची नथसह सात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. तसेच सहभागी महिलांना ५६ पैठणींचे वाटप करण्यात आले. भूम येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. यासोबतच शहराचे ग्रामदैवत आलमप्रभू यांच्या चरणी महाआरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सूर्यकांत कांबळे, थ्री. एस. अकॅडमीचे संचालक प्रा. सोमनाथ देवकर तसेच भूम नगरपरिषदेचे नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी किरण बरकडे, विराज पाटील, हरीश धायगुडे, सचिन येवते आदींनी परिश्रम घेतले.
....................
UMR26A18519
कलदेवनिंबाळा : सुनीता पावशेरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
उमरगा : कलदेवनिंबाळा ग्रामपंचायतीच्या गटनेत्या तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता देविदास पावशेरे यांनी वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम राबविले. पहाटे व्यायाम, तसेच फिरण्यासाठी येणाऱ्या महिला, युवक तसेच नागरिकांना सुकामेव्याचे वाटप करण्यात आले. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शहीद भगतसिंग विद्यालय तसेच तीन अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. याशिवाय शाळा आणि अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी सुनीता पावशेरे म्हणाल्या, की वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत योगदान देऊन सामाजिक जबाबदारी जपण्याचा दरवर्षी प्रयत्न असतो. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.