छत्रपती संभाजीनगर

समाजमाध्यमांवरील अनोळखी संपर्कांपासून सावध राहा!

CD
((अँकर)) ---- समाजमाध्यमांवरील अनोळखी संपर्कांपासून सावध राहा! ---- तरुणांना देशविघातक कृत्यांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता; पोलिस अधीक्षकांचे आवाहन ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. २४ : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधून त्यांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक यांसह अन्य समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या संदेशांची काळजीपूर्वक पडताळणी करावी. संशयास्पद संपर्क किंवा संदेश आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या काही तरुणांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. अशा संपर्कातून तरुणांना जाळ्यात ओढून देशविघातक कृत्यांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत (यूएपीए) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांनी नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला आहे. --- अनोळखी संदेशांना प्रतिसाद देताना सावधगिरी बाळगा समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीकडून संदेश आल्यास उत्तर देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ओळख पडताळून पाहावी. वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील किंवा स्वतःच्या ठिकाणाची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. संशयास्पद संदेशांमधील लिंक उघडणे तसेच अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या फाइल्स किंवा ॲप डाऊनलोड करणे टाळावे. हिंसक अथवा बेकायदेशीर कृत्यांसाठी प्रवृत्त करणारे संदेश, प्रस्ताव किंवा संपर्क आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये. अशा संदेशांकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच त्याबाबत पोलिसांना माहिती देणेही महत्त्वाचे आहे. ----- तातडीने पोलिसांशी संपर्क साधा समाजमाध्यमांवरील संशयास्पद संपर्कामुळे आपण एखाद्या जाळ्यात अडकल्याची शंका आल्यास घाबरून न जाता जवळच्या पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा. वेळेवर माहिती मिळाल्यास संबंधित व्यक्तीला आवश्यक मदत देणे आणि कायद्यानुसार पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्पष्ट केले. समाजमाध्यमांचा वापर करताना जागरूकता आणि सावधगिरी बाळगून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT