सामूहिक कृतीतून सामाजिक प्रगतीला दिशा द्यावी ः बी. बी. मेश्राम
साकेतनगर, ता. १४ ः समाजाच्या प्रगतीसाठी विविध तज्ज्ञ व हितचिंतकांकडील चांगल्या कल्पना आणि उपाययोजनांचे संकलन करून त्यांची सामूहिक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन फुले-शाहू-आंबेडकराइट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी. बी. मेश्राम यांनी केले.
फुले-शाहू-आंबेडकराइट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक विधानाच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त १९० वी मोफत वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा रविवारी (ता.१३) साकेतनगर येथील संस्थेच्या कार्यालयात झाली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मेश्राम बोलत होते. आंबेडकरवादी होण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा मानवतावादी दृष्टिकोन समजून घेण्याबरोबरच एल. एन. हरदास यांचा त्याग आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विलास सुखधा, अॅड. राहुल गायकवाड, शशिकांत काळे, मिलिंद बागुल यांनी मार्गदर्शन केले. अमित खिल्लारे यांनी पुणे कराराच्या राजकीय परिणामांकडे लक्ष वेधले. प्रास्ताविक विलास कटारे यांनी केले. मिलिंद बागुल यांनी आभार मानले. यावेळी मीना संतोष पवार यांच्यासह परिवाराची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.