सौर ऊर्जा कंपनीची वाहने
अडवून मागितली खंडणी
बेंबळी पोलिसांत तीन जणांवर गुन्हा दाखल
धाराशिव, ता. १४ ः शेत शिवरस्त्यावरून जाणाऱ्या सौर ऊर्जा कंपनीच्या वाहनांना अडवून तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाडोळी आ. (ता. व जि. धाराशिव) येथील शेत गट क्र. २३७ मधील शिवरस्त्यावरून सौर ऊर्जा कंपनीची वाहने ये-जा करतात. यासाठी कंपनीने कायदेशीर मोबदला देऊन शेतकऱ्यांशी करारही केला आहे. मात्र, शुक्रवारी (ता. १३) अभिजीत गोविंद भोसले, आकाश गोविंद भोसले आणि गोविंद नामदेव भोसले (सर्व रा. पाडोळी आ., ता. व जि. धाराशिव) यांनी संगनमत करून कंपनीची वाहने अडवली. वाहनांना परवानगी देण्यासाठी अतिरिक्त दोन लाख रुपये आणि कमिशनपोटी एक लाख रुपये अशा एकूण तीन लाखांच्या रकमेची मागणी केली. ही मागणी मान्य न केल्यास शिवीगाळ करत वाहन फोडण्याची आणि या रस्त्याने पुन्हा वाहने आणल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आदेश तात्यासाहेब शिंदे (वय २८, रा. यशोमतीनगर, मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.