sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : थंडीत विद्यार्थी कुडकुडले

विद्यापीठाच्या वसतीगृहातील सोलर वॉटर हिटर बंद

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहातील सोलर वॉटर हिटर दुरुस्तीअभावी वर्षभरापासून चक्क काढून ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन कडाक्याच्या थंडीत कुडकुडत गार पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. त्यामुळे आधीच बदलत्या वातावरणामुळे आजारपण वाढत असतानाच सोलरविना दिवस काढावे लागत असल्याने आरोग्यासह अभ्यासावर परिणाम होत असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.

दरम्यान, मंगळवारी (ता.१३) अधिसभा सदस्य हरिदास सोमवंशी यांनी तत्काळ वसतिगृहाला भेट सोलरची पाहणी केली. यासंदर्भात सदस्य सोमवंशी यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सादिक शेख यांनी कुलगुरू, विद्यार्थी कल्याण विभाग आणि मालमत्ता विभागाला सोलर हिटर बसविण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यानुसार विद्यापीठातील मुलामुलींच्या वसतीगृहात निकामी झालेल्या, दुरुस्तीसाठी काढून ठेवलेल्या सोलर हिटरची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

विद्यापीठातील सहा वसतिगृहात जवळपास दोन हजारांवर विद्यार्थी राहतात या सर्वच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तत्काळ सोलर वॉटर हिटरची दुरुस्ती करण्याची मागणी सादिक शेख, अंकुश सोनवणे, गणेश शिंदे यांनी केली आहे.

वसतिगृहावर बसविलेले सोलर हिटर दुरुस्तीच्या नावाखाली काढून ठेवण्यात आले. यासंदर्भात कुलगुरुंना निवेदन देताच त्यांनी येत्या पाच दिवसात सोलर दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

— हरिदास सोमवंशी, अधिसभा सदस्य.

थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी व्यायाम आणि अभ्यासासाठी उठतो. सहा वाजता वाजता रिडींग रुमला जावे लागते, तेव्हा खूपच थंडी असते. गरम पाण्याची सोय नसल्यामुळे अनेकवेळा आजारी पडायला होते.

— अंकुश सोनवणे, विद्यार्थी.

मगील दोन वर्षांपासून विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे, हे असे चालू राहिले तर आम्ही आंदोलन करणार आहोत.

— सादिक शेख, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT