सासऱ्याच्या घरात जावयाचा डल्ला Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar Crime : सासऱ्याच्या घरात जावयाचा डल्ला; चारचाकी खरेदीसाठी ठेवलेले दोन लाख रुपये लंपास

सासरे घरी नसताना जावयाने घरात घुसून कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये लंपास केले. ही घटना गुरुवारी वडगाव कोल्हाटी सलामपुरेनगर येथे सायंकाळी उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज महानगर : सासरे घरी नसताना जावयाने घरात घुसून कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये लंपास केले. ही घटना गुरुवारी वडगाव कोल्हाटी सलामपुरेनगर येथे सायंकाळी उघडकीस आली.

गजानन कटारे (रा. वडगाव कोल्हाटी) येथे पत्नीसह राहात असून ते मजुरी काम करतात. त्यांची मुलगी अंजली दाभाडे, जावई सुनील दाभाडे आणि मुलगी हे एक वर्षापासून शेजारी राहतात. कटारे यांनी चारचाकी वाहन खरेदीसाठी पैसे जमा करून घरात ठेवत होते. ही गोष्ट जावई सुनील यास माहिती होती.

दरम्यान,गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास कटारे हे कामासाठी घरातून बाहेर पडले होते. वापस परतल्यावर त्यांना ठेवलेल्या ठिकाणी पैसे आढळले नाहीत. याप्रकरणी कटारे यांच्या फिर्यादीवरून सुनील दाभाडे याच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

असा आला चोरीचा संशय

कटारे हे सायंकाळी घरी परतले तेव्हा त्यांची नात खाऊसाठी पैसे मागत होती. त्यावेळी कटारे यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर ‘माझ्या वडिलांकडे खूप मोठे पैसे आहेत’, असे तिने आजोबांना सांगितले. कटारे यांना संशय आल्याने त्यांनी कपाट उघडून पाहिले असता, ठेवलेल्या ठिकाणी पैसे नव्हते. म्हणून ते मुलीच्या घरी गेले. त्यांनी जावयास फोन करून घरी येण्यास सांगितले. पण जावयाने नकार दिला. त्यामुळे जावयानेच चोरी केल्याची सासऱ्याची खात्री झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT