छत्रपती संभाजीनगर

डोळ्यांदेखत सोयाबीन जळतेय, शेतकरी संकटात : पवार कळंब तालुक्यातील शेतांची पाहणी

CD
डोळ्यांदेखत जळतेय सोयाबीन ः पवार कळंब तालुक्यात पाहणी; एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी धाराशिव, ता. २१ : डोळ्यांदेखत सोयाबीन जळत असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे, ही अत्यंत वेदनादायी स्थिती आहे. शासनाने केवळ कागदोपत्री आढावा न घेता अधिकाऱ्यांना थेट बांधावर पाठवून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे केली. जिल्ह्यात पावसाने मारलेल्या प्रदीर्घ दडीमुळे सोयाबीनसह खरीप पिकांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी रविवारी (ता. २०) कळंब तालुक्यातील रत्नापूर, चोराखळी, येरमाळा, हावरगाव, मस्सा व वाशी तालुक्यातील तेरखेडा परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. बांधावर जाऊन त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गेल्या वर्षीचा थकीत पीकविमा तातडीने वितरीत करावा. येत्या पाच दिवसांत चारा छावण्या सुरू कराव्यात आणि शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांना मोठा दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. या पाहणी दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, माजी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टेकाळे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बालाजी आल्टे, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, नगरसेवक खलिफा कुरेशी, आयाज शेख, शेखर घोडके, रोहित बागल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ....... धाराशिव ः आमदार रोहित पवार यांनी कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि इतर पदाधिकारी. ... फोटो क्रमांक ः OSM26B07047

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT