छत्रपती संभाजीनगर

सोयाबीनच्या तुटवड्यामुळे उदगीरचा तेलमिल उद्योग संकटात

CD
-- तेल मिल उद्योगाला सोयाबीनचा तुटवडा ---- दुष्काळाचा परिणाम : कच्च्या मालाअभावी तीन मोठे प्लांट बंद ठेवण्याची वेळ; हजारो कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता -- युवराज धोतरे उदगीर, ता. २२ : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच सोयाबीनचा उतारा घटल्याने बाजारात अपेक्षित प्रमाणात सोयाबीन उपलब्ध होत नाही. परिणामी, उदगीर परिसरातील सोयाबीन प्रक्रिया उद्योगांसमोर कच्च्या मालाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, सोयाबीनच्या तुटवड्यामुळे येथील तेल मिल उद्योग संकटात सापडला आहे. वाढत्या सोयाबीन दरांच्या तुलनेत प्रक्रिया करून तयार होणाऱ्या डीओसीचे (डिफॅटेड सोया मिल) दर स्थिर असल्याने कारखानदारांना आर्थिक गणित जुळविणे कठीण झाले आहे. उदगीर परिसरात नारायणा ॲग्रो इंडस्ट्रीज, सचिन ॲग्रो इंडस्ट्रीज (करडखेल) आणि मुक्कावार ॲग्रो इंडस्ट्रीज हे तीन सोयाबीन प्रक्रिया करणारे मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमुळे परिसरातील अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. तसेच शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी, वाहतूक, प्रक्रिया आणि तयार उत्पादनांची विक्री अशा विविध माध्यमांतून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. त्यामुळे उदगीरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात या उद्योगांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र, सध्या सोयाबीनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने या तिन्ही प्लांटसमोर उत्पादन सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योग चालविण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची आवश्यकता असते. मात्र, यंदा कमी पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून, शेतकऱ्यांच्या हाती येणारा उताराही कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारातून पुरेशा प्रमाणात सोयाबीन खरेदी करणे कारखानदारांना कठीण जात आहे. एकीकडे सोयाबीनची उपलब्धता कमी होत आहे, तर दुसरीकडे उपलब्ध सोयाबीनचे बाजारभाव वाढत आहेत. अशा परिस्थितीत वाढीव दराने सोयाबीन खरेदी करून त्यावर प्रक्रिया करणे आणि त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री करणे, हे उद्योगांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळित झाल्याने उदगीर परिसरातील तीन मोठ्या प्लांटचे कामकाज बंद ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योगाच्या आर्थिक गणितात डीओसीच्या दरांना महत्त्वाचे स्थान आहे. सोयाबीनवर प्रक्रिया केल्यानंतर तेलासोबत डीओसी हे उत्पादन मिळते. प्रामुख्याने पशुखाद्य उद्योगात त्याचा वापर होतो. सोयाबीन खरेदी, वाहतूक, प्रक्रिया, वीज आणि कामगारांवरील खर्च विचारात घेता, तयार उत्पादनांच्या विक्रीतून पुरेसा परतावा मिळणे आवश्यक असते. मात्र, सोयाबीनचे खरेदीदर वाढत असताना डीओसीचे दर त्या प्रमाणात वाढत नसल्याने प्रक्रिया उद्योगांचे आर्थिक गणित बिघडत आहे. वाढीव दराने सोयाबीन खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली, तरी तयार उत्पादनांच्या विक्रीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यास कारखानदारांना तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत उत्पादन सुरू ठेवण्यापेक्षा काही काळ कारखाने बंद ठेवणे परवडणारे ठरत असल्याचे दिसून येत आहे. उदगीर परिसरातील सोयाबीन प्रक्रिया उद्योग हे केवळ कारखानदारांपुरते मर्यादित नसून, त्यांच्याशी अनेक घटक जोडलेले आहेत. कारखान्यांतील कामगार, वाहनचालक, वाहतूकदार, हमाल, व्यापारी आणि अन्य पूरक व्यावसायिकांची उपजीविका या उद्योगांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्लांटचे कामकाज बंद राहिल्यास या सर्व घटकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारखाने दीर्घकाळ बंद राहिल्यास कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच सोयाबीनची खरेदी कमी झाल्यास शेतमालाच्या बाजारपेठेवर आणि वाहतूक व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उदगीरच्या औद्योगिक क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या या संकटाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. -- डीओसी आयातीच्या धोरणाचीही चिंता -- सोयाबीन प्रक्रिया उद्योगासमोर आणखी एक संभाव्य आव्हान म्हणजे केंद्र सरकारचे डीओसी आयातीसंदर्भातील धोरण. डीओसीची आयात वाढल्यास देशांतर्गत बाजारातील उपलब्धता आणि दरांवर परिणाम होऊ शकतो. परिणामी, स्थानिक कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या डीओसीला अपेक्षित दर मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच वाढलेल्या सोयाबीन खरेदीदरामुळे अडचणीत आलेल्या कारखानदारांना तयार उत्पादनांचे दर घसरल्यास दुहेरी आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे डीओसीच्या आयातीसंदर्भातील धोरण, देशांतर्गत बाजारातील मागणी आणि सोयाबीनच्या उपलब्धतेचा समतोल या बाबी तेल मिल उद्योगासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. -- शेतकरी, उद्योगांसमोर दुहेरी संकट -- सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्यावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, उपलब्ध सोयाबीनचे दर वाढल्याने प्रक्रिया उद्योगांचा उत्पादन खर्च वाढत आहे. मात्र, तयार उत्पादनांच्या दरांत अपेक्षित वाढ होत नसल्याने कारखानदारांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदाची परिस्थिती शेतकरी आणि तेल मिल उद्योग या दोन्ही घटकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. सोयाबीनची उपलब्धता वाढणे, बाजारातील दरांमध्ये समतोल राहणे आणि प्रक्रिया उद्योगांना परवडणारे आर्थिक गणित निर्माण होणे आवश्यक आहे. अन्यथा, उदगीर परिसरातील सोयाबीन प्रक्रिया उद्योगांचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -- कोट-- यावर्षी सोयाबीनचा पुरवठा कमी आहे. त्यातच सोयाबीनचे भाव वाढत आहेत. त्या प्रमाणात डीओसीचे दर वाढायला हवेत. पण ते वाढताना दिसून येत नाहीत. त्यामुळे कारखानदारांची आर्थिक गणित बिघडले आहे. शिवाय डीओसीची आयात सुरू झाल्यास कारखानदारांवर संकट येणार आहे. सोयाबीनचे दरही कमी होऊन शेतकऱ्यांचे हे नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. सागर महाजन, कार्यकारी संचालक, नारायणा ॲग्रो इंडस्ट्रीज, उदगीर --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas : "अण्णा, आमच्या लग्नाचं बघा; नोकरी लागेपर्यंत मानधन द्या!"; महायुतीच्या प्रचारसभेत पदवीधर तरुणाची आमदार सुरेश धसांकडे भावनिक साद..!

IND vs NZ 1st T20I : २७ धावांत ४ विकेट्स... संजू सॅमसनचे वादळ दुर्दैविरित्या थांबले अन् टीम इंडियाच्या गटांगळ्या; तिलक, इशान यांनी विश्वास तोडला... Video

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Viral Video: आईच्या कुशीत मस्ती करणारे वाघाचे बछडे; ताडोबाच्या जंगलातील मायेचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

Thyroid Diet Tips: थायरॉईडच्या रुग्णांनी खाण्यापूर्वी विचार करा! 'या' पदार्थांबाबत डॉक्टर काय सांगतात?

SCROLL FOR NEXT