छत्रपती संभाजीनगर

दहिफळ येथे १ गुंठ्यात अवघे १.५५ किलो सोयाबीन एकरी ६२ किलोच उत्पादन, पीक कापणी प्रयोगातून नुकसानीची भीषणता स्पष्ट

CD
((चार मेन)) ................. दहिफळला गुंठाभरात निघाले अवघे १.५५ किलो सोयाबीन एकरी ६२ किलोच उत्पादन, पीक कापणी प्रयोगातून नुकसानीची भीषणता स्पष्ट राहुल थोरवे दहिफळ, ता. ८ : चालू खरीप हंगामात अल्प पाऊस आणि हवामानाच्या लहरीपणामुळे पडलेल्या दुष्काळाची भीषण दाहकता आता प्रत्यक्ष शेतातून समोर येत आहे. दहिफळ (ता. कळंब) येथे एनडीआरएफच्या निकषानुसार घेण्यात आलेल्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगात अवघ्या १ गुंठा (१० मीटर × १० मीटर) क्षेत्रातून केवळ १ किलो ५५० ग्रॅम (१.५५० किलो) एवढेच उत्पादन हाती आले आहे. म्हणजेच एकरी ६२ किलो उत्पादन शेतकऱ्याच्या हाती येत असल्याची स्थिती आहे. या नगण्य उत्पादनावरून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचे किती मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, याचे वास्तववादी चित्र स्पष्ट झाले आहे. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एनडीआरएफच्या अधिकृत नियमानुसार १ गुंठा प्रातिनिधिक क्षेत्रातील सोयाबीनची कापणी आणि मळणी करून उत्पादनाची नोंद घेतली. एरवी याच क्षेत्रातून निघणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा हाती आलेले उत्पादन अत्यंत निराशाजनक असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पीक कापणी प्रयोगाप्रसंगी एआयसीचे विभागीय समन्वयक बाबासाहेब इनकर, जिल्हा समन्वयक अमोल मुळे, तालुका समन्वयक सार्थक नवले, कृषी विस्तार अधिकारी के. डी. निंबाळकर, सहाय्यक कृषी अधिकारी बी. डी. खाडे , ग्रामपंचायत अधिकारी एस.ए. मडके, ग्राम महसूल अधिकारी ए.बी. पवार, श्रीपती मते यांच्यासह स्थानिक शेतकरी वैजिनाथ भातलवंडे उपस्थित होते. .......... ((चौकट)) दुष्काळी मदतीसाठी नोंदी महत्त्वाच्या पीक कापणी प्रयोगातून समोर येणाऱ्या या तुटपुंज्या उत्पादनाच्या आकडेवारीवरूनच सरासरी उत्पादन तूट निश्चित केली जाते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी शासकीय मदत, पीकविमा भरपाई आणि विविध योजनांचे लाभ मिळण्याच्या दृष्टीने १ गुंठ्यातून हाती आलेल्या या १.५५० किलो उत्पादनाची अधिकृत नोंद महत्त्वाची ठरणार आहे. ....... दहिफळ ः सोयाबीन पीक कापणी प्रयोगात अवघ्या १ गुंठा क्षेत्रातून केवळ १ किलो ५५० ग्रॅम एवढेच उत्पादन हाती आले. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, शेतकरी. .... फोटो क्रमांक ःOSM26B07147

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT