sakal
sakal
छत्रपती संभाजीनगर

सोयगाव : रुद्रेश्वर धरणाला गळती, प्रशासन हादरले

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : सोयगाव तालुक्याला सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवस झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या रुद्रेश्वर धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्याने पाण्याची गळती सुरु झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघड झाली होती मात्र धरण फुटल्याच्या अफवेने तालुका प्रशासनाची दमछाक उडाली होती.घटनास्थळी तहसीलदार रमेश जसवंत यांच्या पथकाने भेटी देण्यासाठी धावा घेतली असता नाल्याच्या पुराच्या पाण्यात प्रशासनाचे वाहनही अडकले होते.

सोयगाव शहराजवळ असलेल्या रुद्रेश्वर धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्याने गलवाडावाडी या दोन गावात खळबळ उडाली होती. प्रशासनाकडे धरण फुटल्याचा दूरध्वनी येताच तहसीलदार रमेश जसवंत, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी तातडीने भेट दिली परंतु नाल्याच्या पुरात प्रशासनाची वाहने अडकल्याने अखेरीस गलवाडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सत्यनारायण पुल्लेवाड घटनास्थळी पोहचून त्यांनी घटनेची माहिती तालुका प्रशासनाला दिली असता धरणाच्या संरक्षण भिंतीतून भगदाड पडून पाण्याची गळती होत असल्याची माहिती मिळाल्यावर प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.

या धरणाच्या भगदाड पडल्या प्रकरणी तातडीने तहसीलदार रमेश जसवंत यांनी आगामी पावसाचा कालावधी लक्षात घेवून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला असून रुद्रेश्वर धरणातून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गलवाडा, वेताळवाडी आणि सोयगाव शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाची परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिल्या आहे.

सोयगाव,गलवाडा,वेताळवाडी आदी गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नागरोकांनी घाबरून जावू नये कोणतीही अफवा कानावर आल्यास तातडीने सोयगाव तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT