‘पदवीधर’ च्या मतदानासाठी
मतदारांना विशेष नैमित्तिक रजा
-------
खासगी आस्थापनासाठी चार तासांची सवलत
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १९ : भारत निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतदानासाठी शुक्रवारी (ता.२३) मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सुधारित पत्रानुसार, खासगी आस्थापनांत काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी दोन ऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १३५ ब नुसार ही भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही विशेष रजा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. ही रजा केवळ संबंधित मतदारसंघातील मतदार असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच लागू असणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील, याची दक्षता कार्यालय प्रमुखांनी घ्यावी. हि विशेष नैमित्तिक रजा खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही. मात्र, मतदान केंद्रांचे अंतर काही ठिकाणी अधिक असल्याने प्रवासाचा वेळ लक्षात घेता, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात यावी असेही कळविण्यात आले आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.