भूमिहीन वंचितांना विशेष पॅकेज द्या
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिले निवेदन
कळंब, ता. १९ (बातमीदार) : हवामान बदलामुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका भूमिहीन पारधी आदिवासी, दलित आणि वंचित समाजघटकांना बसत आहे. हाताला काम नाही, उत्पन्नाचे साधन नाही आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही दिसत नसल्याने या कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त वंचित समाजासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून तातडीने मदत करावी, अशी मागणी श्रमिक मानवाधिकार संघाच्या सचिव तथा मानवी हक्क अभियानाच्या जिल्हाध्यक्ष माया शिंदे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली.
दिल्ली येथे आठवले यांची भेट घेऊन शिंदे यांनी मराठवाड्यातील वंचित समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी सादर केलेल्या निवेदनातून दुष्काळग्रस्त भूमिहीन कुटुंबांच्या आर्थिक, सामाजिक आणि निवासविषयक समस्यांवर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पारधी आदिवासी, अनुसूचित जाती तसेच इतर पारंपरिक वननिवासींचे वनहक्क अधिनियम २००६ नुसार प्रलंबित असलेले दावे तातडीने निकाली काढावेत. पात्र लाभार्थ्यांना वनजमिनी आणि गायरान जमिनी त्यांच्या नावे कराव्यात. वर्षानुवर्षे निवासी अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांची घरे नियमानुकूल करून त्यांना मालकी हक्क द्यावेत, तसेच घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. बंद करण्यात आलेली रमाई आवास योजना पुन्हा सुरू करावी. धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यातील महिला बचतगटांचे कर्ज आणि त्यावरील व्याज दुष्काळी परिस्थितीचा विचार करून माफ करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.