sambhaji nagar
sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : गतिरोधक थांबवताहेत जीवनाची गती ; ना पांढरे पट्टे, ना फलक : बनले लहान-मोठ्या अपघातांचे स्थळ

ऋषिकेश साळवी

वाळूजमहानगर : वाहनांच्या गतीला मर्यादा असावी, अपघात टाळले जावे आणि वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीसह बजाजनगर या कामगार वसाहतीतील चौकाचौकांत टाकण्यात आलेले गतिरोधक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

वाळूज औद्योगिक वसाहतीत तसेच बजाजनगर या कामगार वसाहतीतील गर्दीच्या ठिकाणी व चौकाचौकांमध्ये एमआयडीसीच्या वतीने नव्याने गतिरोधक टाकण्यात आलेले आहेत. पूर्वी याच ठिकाणी तीन लाइन असलेले, अंदाजे सहा इंच उंच व एक फुटाच्या अंतरावर असे डांबराचे गतिरोधक टाकण्यात आले होते.

काही ठिकाणी प्लास्टिकचेही गतिरोधक होते. मात्र, ते काढण्यात येऊन त्याच ठिकाणी डांबराचे चार ते पाच फूट रुंदीचे एकच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. तथापि, या गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत किंवा येथे गतिरोधक आहे असे फलकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्यावरील डांबर व नव्याने टाकण्यात आलेले गतिरोधक एकसारखेच दिसते. गतिरोधकाला पांढरे पट्टे मारले असते तर ते वाहनधारकांच्या लक्षात आले असते आणि अपघात टळले असते.

वाळूज परिसरातील या गतिरोधकांवर दररोज लहान-मोठे अपघात होत असून अनेक जण जखमी होत आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून एमआयडीसी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT