छत्रपती संभाजीनगर

वेशभूषेतून संस्कृतीचे दर्शन, गीतांतून सुरांची बरसात

CD
फोटो, (ABD26J82282) सिडको ः गीता भवन येथे स्फूर्ती महिला मंडळातील सदस्यांसह विविध वेशभूषेत असलेल्या महिला. -- वेशभूषेतून संस्कृतीचे दर्शन, गीतांतून सुरांची बरसात सिडको, ता. २९ ः स्फूर्ती महिला मंडळातर्फे गीता भवन येथे देवत्वापासून समाज प्रबोधनापर्यंतच्या विविध भूमिका साकारत महिलांनी आपल्या कलागुणांना मंच मिळवून दिला. कुणी संतपरंपरेतील व्यक्तिमत्त्व साकारले, तर कुणी ऐतिहासिक स्त्रीशक्तीची ओळख करून दिली. या वैविध्यपूर्ण वेशभूषा सादरीकरणानंतर कोजागरीच्या चांदण्यात जुन्या हिंदी-मराठी गीतांनी मैफलीत रंग भरला. स्फूर्ती महिला मंडळाचा शारदोत्सव, कोजागरीनिमित्त दोनदिवसीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. उत्सवादरम्यान अध्यक्ष मीरा पत्की, उपाध्यक्ष ऊर्मिला मगर व सचिव सुमेधा हुमनाबादकर यांनी शारदेची पूजा व आरती केली. चित्रा पिलखाने यांनी ‘अवली’, वृषाली बांते यांनी ‘नटसम्राट’मधील ‘कावेरी’, वंदना आचार्य यांनी ‘मंथरा’, निर्मला सांबरे यांनी ‘पंजाबी बाई’, विभा श्रीवास्तव यांनी तमाशा कलावंत , सुवर्णा चोबे यांनी राजमाता जिजाऊ, सीमा पाठक यांनी सावित्रीबाई फुले, सुविधा तेरकर यांनी हास्यजत्रेतील ‘लाली’, नलिनी कुलकर्णी यांनी संत मीरा यांच्या वेशभूषा सादर केल्या. त्यानंतर बुधवारी (ता. २८) पार पडलेल्या मैफलीत विविध गीते सादर केली. ‘भैरवी’ने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमेधा हुमनाबादकर यांनी सूत्रसंचालन केले. वीणा म्हैसेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

SCROLL FOR NEXT