छत्रपती संभाजीनगर

स्पायना बिफिडासाठी घाटीत आता स्वतंत्र मासिक क्लिनिक

CD
टळू शकतो जन्मजात पांगळेपणा, अर्धांगवायू --- स्पायना बिफिडासाठी घाटीत आता स्वतंत्र मासिक क्लिनिक, जनजागृतीसाठी कार्यशाळा -- छत्रपती संभाजीनगर, ता. ७ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) शल्यचिकित्सा विभाग आणि ‘स्पायना बिफिडा फाउंडेशन’तर्फे रविवारी (ता. सहा) कार्यशाळा झाली. जन्मापासूनच लहान मुलांमध्ये अर्धांगवायू (लकवा) आणि अन्य गंभीर समस्या निर्माण करणाऱ्या ‘स्पायना बिफिडा’ या जन्मदोषाबाबत जनजागृती करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी स्पायना बिफिडाच्या रुग्णांसाठी ‘स्वतंत्र मासिक क्लिनिक’ सुरू करण्याची घोषणा केली. स्पायना बिफिडाबाबत समाजात अद्याप पुरेशी जनजागृती नसल्याचे या कार्यक्रमातून समोर आले. स्पायना बिफिडा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष करमरकर यांनी सांगितले, की गरोदरपणात योग्य प्रमाणात फॉलिक ॲसिड घेतल्यास हा जन्मदोष टाळण्यास मदत होऊ शकते. प्रसूतीपूर्व काळजीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही फॉलिक ॲसिडचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्रात न्यूरोसर्जन डॉ. नितीन कोटेचा, ज्येष्ठ बालशल्यचिकित्सक डॉ. विवेक घारपुरे, बालशल्यचिकित्सक डॉ. राजीव तोतला, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी, फेटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रार्थना शाह आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. अजय भारसाट यांनी स्पायना बिफिडाचे निदान, उपचार, प्रतिबंध आणि पुनर्वसन याविषयी मार्गदर्शन केले. विविध पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या सत्रांचा लाभ घेतला. डॉ. अर्चना कल्याणकर, डॉ. प्रशांत भिंगारे आणि डॉ. रामदास नागरगोजे यांनी आजाराची सविस्तर माहिती दिली. स्पायना बिफिडाचा त्रास असूनही यशस्वी करिअर घडविलेल्या व्यक्तींनी आपल्या संघर्षाचे आणि परिस्थितीवर मात केल्याचे अनुभव कथन केले. यावेळी झालेल्या तबला वादनाच्या सादरीकरणाने कार्यक्रमात वेगळा रंग भरला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे आणि शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. डॉ. अबोली हुकेरी, डॉ. जगन्नाथ काळे, डॉ. मनाली कामत आणि डॉ. शुभम ढमढेरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. -- १५ मुलांची तपासणी या उपक्रमाचा एक भाग म्हणून ५ सप्टेंबरला शहरातील १५ मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. स्पायना बिफिडाच्या रुग्णांना निदानापासून उपचारांपर्यंत आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे स्वतंत्र मासिक क्लिनिक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. --- स्पायना बिफिडा म्हणजे काय? स्पायना बिफिडा हा एक जन्मजात आजार आहे. गर्भाच्या वाढीदरम्यान बाळाच्या पाठीचा कणा आणि मज्जारज्जू पूर्णपणे बंद न झाल्यामुळे हा दोष निर्माण होतो. त्यामुळे बाळाच्या पाठीवर सूज, गाठ किंवा खळगा दिसू शकतो. --- याचे काय परिणाम होतात? स्पायना बिफिडामुळे मज्जारज्जूला इजा झाल्यास बाळाच्या पायांमध्ये अशक्तपणा येऊ शकतो किंवा पाय निकामी होऊ शकतात. काही मुलांना चालण्यास अडचण येते. तसेच लघवी व शौचावर नियंत्रण ठेवण्यात त्रास होतो. काही मुलांच्या मेंदूमध्ये अतिरिक्त पाणी साचून ‘हायड्रोसेफलस’ ही समस्या उद्‍भवू शकते. बाळाच्या पाठीवर केसांचा पुंजका, चट्टा किंवा खळगा दिसणे हीदेखील याची काही लक्षणे असू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT