Maratha Reservation Esakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation: मराठा आंदोलक आक्रमक! छत्रपती संभाजीनगरमधून सुटणाऱ्या एसटी बसेस रद्द

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू असून, राज्याच्या काही भागात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू असून, राज्याच्या काही भागात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. नांदेड आणि बीड जिल्ह्यातील एसटी बसवर दगडफेक करण्यात आली, बस देखील पेटवली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बस स्थानकातून काही बस रद्द करण्यात आल्या आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील बस स्थानकातून कन्नड, पैठण, बीड आणि जालना या ठिकाणी जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहे. तर, सिल्लोड आणि पुणे या महामार्गावरील बस सध्या सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

बीड-कल्याण एसटी बसवर दगडफेक

बीड कल्याण बसवर तुफान दगडफेक करत एसटी बस फोडण्यात आली आहे. बीडच्या सराटा गाव परिसरात ही घटना घडली असून मराठा आंदोलक बस फोडून घटनास्थळावरून निघून गेले. बीडमध्ये मध्यरात्री बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला. तर बीडच्या धुळे सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली. आज सकाळी पुन्हा एकदा बीड पासून काही अंतरावर असलेला चराटा फाटा या ठिकाणी कल्याण गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

उमरखेडमध्ये अज्ञातांनी बसला लावली आग

नांदेडहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी बसला आग लावली. शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. या आगीत बस जळून पूर्णत: खाक झाली.

या घटनेनंतर रात्री बस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा सकाळी बस चालू झाल्या. आंदोलकांनी बीडच्या सराटा फाटा रोडला कल्याण गाडीवर दगडफेक करत या गाडीचं नुकसान केलं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT