औरंगाबाद : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी नागपूर ते शिर्डी ही बससेवा गुरुवार (ता. १५) पासून सुरु होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागातर्फे औरंगाबाद-नागपूर ही शयनयान बससेवा सुरु करण्यात येत आहे. प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयनयान-आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना २ बाय १ पध्दतीची ३० आसने (पुशबॅक सिट) उपलब्ध असून त्यात १५ शयन आसने (स्लिपर) आहेत. सदरची बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता पोचेल.
सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात पूर्ण मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना पन्नास टक्के सवलत आहे.
औरंगाबाद-नागपूर सेवा
नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. सदरची बस ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालनामार्गे पहाटे ०५.३० वाजता पोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तासांची बचत होणार आहे. सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आहे. तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आहे. प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.