छत्रपती संभाजीनगर

घरमालकावर चाकूने हल्ला!

CD
घरमालकावर चाकूने हल्ला! छत्रपती संभाजीनगर : भाडेकरूकडे आलेल्या तिघांना घरात धिंगाणा घालण्यास आणि शिवीगाळ करण्यास मज्जाव केल्याने घरमालकावरच चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. एक) घडली. राजेश आण्णा शिंदे (वय ४३, व्यवसाय मजुरी) असे जखमीचे नाव आहे. रोहन दत्ता आव्हाड आणि रोहित कांबळे (दोघेही रा. विश्रांतीनगर) यांनी राजेश शिंदे यांना पकडून ठेवले, तर त्यांच्यासोबतच्या एका अनोळखी इसमाने चाकूने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराखाली वार करून जखमी केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास सहायक फौजदार कोंडके करत आहेत. ------ कौटुंबिक वादातून दोन्ही गटांत मारहाण छत्रपती संभाजीनगर : जोगेश्वरी येथील आंबेडकरनगर परिसरात मातोश्री हॉटेलसमोर कौटुंबिक वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना (ता.२९) घडली. अफजल सरदार शेख (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शकील शेख याने लाकडी दांड्याने अफजल आणि त्यांचा भाऊ अहमद यांना मारहाण करून जखमी केले. तसेच हसीना शेख हिने अफजल यांच्या पत्नी सुलताना यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमन शेख आणि अरमान शेख यांनी संगनमत करून अजीज व इस्माईल यांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सांगळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

Latest Marathi News Live Update: बनावट विदेशी मद्य साठ्याप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

VIDEO : तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजक’ संबोधलं? तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील व्हिडीओवरून वाद

SCROLL FOR NEXT