छत्रपती संभाजीनगर

ब्लॅकआऊट : मानवी दुष्परिणामाचे नाटक 

सुधीर सेवेकर

औरंगाबाद : आऊटब्लॅक : आपले वागणे-बोलणे, परस्पर संबंध हे विलक्षण स्वार्थी आणि दुटप्पीपणाचे होत चालले आहे. समोर एक, मागे एक. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. वरकरणी सहकाऱ्यांशी अत्यंत प्रेमाचे व हसते-खेळते संबंध; परंतु त्याच सहकाऱ्यांची त्यांच्या माघारी यथेच्छ निंदानालस्ती. हा अनुभव प्रत्येकाचाच असतो. कारण प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात असेच तर वागत वावरत असतो. 

या दुटप्पीपणावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे नाटक आहे - ब्लॅकआऊट. यामध्ये प्रवासी कंपनी ट्रॅव्हल एजन्सीचे एक ऑफिस दाखवलेय. त्या ऑफिसच्या एका खात्याचे सहा कर्मचारी - त्यात चार स्त्रिया आणि दोन पुरुष. त्यांचे परस्परांशी संबंध विलक्षण खेळीमेळीचे, सहकार्याचे, जिव्हाळ्याचे आहेत असे आरंभीच्या दृश्‍यांवरून आपल्याला वाटते; पण जसजसे नाटक पुढे सरकते तसतसे जाणवायला लागते की प्रत्यक्षात हे तसे नाहीय. उलट आकस, असूया, हेवेदावे, खोटारडेपणा, ईर्षा अशा भावभावनांनीच हे संबंध पछाडलेले आहेत.

त्या खात्यात एक आधी सरळ स्वभावाची आणि मुख्य म्हणजे प्रांजळ वर्तनाची एक नवीन तरुणी दाखल होते आणि या सर्वांमधला हा तोंडदेखलेपणाचा, दुटप्पीपणाचा खेळ आणखीनच रंगत जातो. त्यात या नवीन मुलीस कंपनीच्या कामकाजात मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे याचा सुगावा लागतो आणि खेळ आणखीनच रोमहर्षक बनत जातो. 

नाटक विलक्षण रेसी म्हणजे गतिमान झालेले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा चटपटीतपणा, स्मार्टपणा, वेगवान हालचाली, इंग्रजी भाषा, लॅपटॉप, मोबाईल आदी आधुनिक उपकरणांचा सराईत वापर हे सगळे मोठे छान दाखवलेय. त्यात अचानक वीज जाते आणि टाइमपास म्हणून जो ट्रुथ ऑर डेअरिंगसारखा खेळ हे कर्मचारी मोबाईलच्या फ्लॅशलाइटच्या प्रकाशात खेळू लागतात आणि त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो.

नाटक अधिकाधिक उत्कंठावर्धक बनत जाते. हा भाग मस्त जमलाय. पार्श्‍वसंगीतही नाटकाची प्रकृती आणि मूड आणखीन उठावदार होईल असेच वापरलेय. हे नाटक पाहताना अलीकडच्या "इन्कार' नामक चित्रपटाची आणि तेंडुलकरांच्या पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी आलेल्या "शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकाची आठवण रसिकांना होते. "ब्लॅकआऊट'ची लेखिका भाग्यश्री पाणे यांनी यातील एक भूमिकाही मोठ्या झोकात केली आहे. एक चांगले नाटक पाहिल्याचे समाधान "ब्लॅकआऊट'मध्ये होते हे नक्की. 

- ब्लॅकआऊट : लेखिका भाग्यश्री अशोक पाणे 
- नेपथ्य : संदेश बेंद्रे 
- प्रकाश : श्‍याम चव्हाण 
- संगीत : यशोधन पाणे 
- दिग्दर्शन : संदेश जाधव 
- कलावंत : दिशा दानडे, दर्शना रसाळ, संध्या कुलकर्णी, सुहास लाखन, पूजा माटल, भाग्यश्री पाणे आणि अतिम पारकर. 
- सादरकर्ते : प्रवेश कला व क्रीडा मंच मुंबई. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT