Sambhaji Nagar Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : शहरातून दिवसाला एक दुचाकी चोरीस ; पोलिसांपुढे आव्हान

कोणी कर्ज काढून दुचाकी घेते तर कोणी मेहनतीने पैसे साठवून दुचाकी घेतो. सध्याच्या काळात दुचाकी हा महत्त्वाचा भाग झाला आहे. या दुचाकीवर कोणी डल्ला मारल्यास दुचाकी मालकावर हतबल होण्याची वेळ येते.

सकाळ वृत्तसेवा

विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर : कोणी कर्ज काढून दुचाकी घेते तर कोणी मेहनतीने पैसे साठवून दुचाकी घेतो. सध्याच्या काळात दुचाकी हा महत्त्वाचा भाग झाला आहे. या दुचाकीवर कोणी डल्ला मारल्यास दुचाकी मालकावर हतबल होण्याची वेळ येते. शहरातील विविध भागांतून रोज किमान एक दुचाकी चोरीची घटना घडत आहे. यंदा मे महिन्याअखेरीस आतापर्यंत २१६ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद असून, याचे तपासाचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. आतापर्यंत केवळ ३६ दुचाकी शोधण्यास पोलिसांना यश मिळाले. या दुचाकी पोलिसांना तुला शोधू कुठे असे म्हणायची वेळ आली आहे.

शहरातील विविध मॉल, बाजारपेठ, सार्वजनिक पार्किंग, बसस्टँड, रेल्वेस्टेशन, कोचिंग क्लासेस आदी गर्दीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासोबतच घराच्या, अपार्टमेंटच्या पार्किंगमध्येही दुचाकी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. हँडल लॉक लावल्यानंतरही आपली दुचाकी सुरक्षित राहील याबाबत वाहनधारकांना खात्री राहिलेली नाही.

दुचाकी उभी केल्यानंतर वाहनधारक तेथून गेल्यानंतर काही वेळात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. मे २०२४ अखेरीस आतापर्यंत किमान २१४ दुचाकी शहरातील विविध भागांतून चोरीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी काही घटनांत गुन्हे नोंद असून, काही घटनांत संबंधित पोलिस ठाण्यात रजिस्टरला नोंद करण्यात आली. यापैकी ३६ दुचाकी सापडण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT