चोरीच्या केबलसह तिघे
ताब्यात; तीन गुन्हे उघड
-टाकळी निलवर्ण शिवारात कारवाई
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ४ ः स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने टाकळी निलवर्ण शिवारात कारवाई करून चोरीच्या केबलसह तिघांना ताब्यात घेतले. शनिवारी (ता.तीन) केलेल्या या कारवाईत जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून केबल, रोख रक्कम, दोन दुचाकी असा एकूण ४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मानवत रोड परिसरात गस्तीवर होते. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे टाकळी निलवर्ण शिवारात सापळा रचून बाबू उर्फ बाबुराव अण्णासाहेब शिंदे (वय २७, रा. कुटुंबवाडी, ता. परभणी), सुनील शिवाजी शिंदे (वय २८, रा. टाकळी निलवर्ण, ता. मानवत) आणि लखन हिरामण धोत्रे (वय १८, रा. हिस्सी, ता. सेलू) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसी परिसरात चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या ताब्यातून ३ लाख रुपये किमतीची केबल, ८९ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण ४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या चौकशीत मानवत पोलिस ठाण्यातील दोन आणि बोरी पोलिस ठाण्यातील एक, अशा तीन गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जायभाये, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, सवंडकर, हवालदार माणिक डुकरे, सूर्यकांत फड, विष्णू चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, नामदेव दुबे, मधुकर ढवळे, अमलदार राम पौळ आणि चालक हणवते यांच्या पथकाने केली.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.