‘मायक्रो फायनान्सच्या वसुलीतील दादागिरी रोखा’
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ ः मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी महिलांना धमकावण्याचे प्रकार रोखावेत, महार हाडोळा जमिनींच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाची चौकशी करावी आणि अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीला आळा घालावा, अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या.
यासंदर्भात १५ ऑक्टोबर रोजी निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची सोमवारी (ता. दोन) भेट घेतली. दुष्काळामुळे महिलांचे रोजगार व उत्पन्न घटले असून, हप्ते थकल्याच्या कारणावरून काही फायनान्स कंपन्यांचे वसुली प्रतिनिधी रात्री-अपरात्री फोन करून महिलांना धमकावत असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. यावर सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि खासगी सावकारांची बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहर व जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या महार हाडोळा जमिनींच्या मालकी हक्कांची तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि जमिनी मूळ हक्कदारांना परत द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. तसेच लिंबे जळगाव टोलनाक्यावर विशेष तपासणी पथक नेमून अवैध मुरूम वाहतूक रोखावी आणि संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळात पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, सूरज मुळे, राजन कीर्तने, रवी रत्नपारखे, राहुल मकासरे, बनेखॉ पठाण आणि सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.