Aboration Sakal
छत्रपती संभाजीनगर

'गर्भपात' पाप नव्हे महापाप

गर्भपातासाठी बाजारात असलेल्या गोळ्यांची विक्री करणे सहजासहजी शक्य नाही. त्यासाठी संबंधित डॉक्टरांनी तीन प्रिस्क्रिप्‍शन द्याव्या लागतात.

सकाळ वृत्तसेवा

शेखलाल शेख

शहरात सुरू असलेले अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपात केंद्राचा महापालिकेने भंडाफोड केला. यात दिवसेंदिवस आरोपींची संख्या वाढत आहे. याचे जाळे संपूर्ण मराठवाड्यात पसरलेले आहे. एवढेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातूनही गर्भपातासाठी महिला येत असल्याचे उघडकीस आले आहे. अनेक वर्षांपासून हे महापाप सुरू होते. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. बीड जिल्ह्यातील सुदाम मुंडे प्रकरणानंतरचे हे सर्वांत मोठे रॅकेट आहे. ते कसे चालत होते, त्याचा होणारा परिणाम यावर टाकलेला हा प्रकाश.

गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून

गर्भपातासाठी बाजारात असलेल्या गोळ्यांची विक्री करणे सहजासहजी शक्य नाही. त्यासाठी संबंधित डॉक्टरांनी तीन प्रिस्क्रिप्‍शन द्याव्या लागतात. त्याच्या नोंदी डॉक्टर, औषध विक्रेता आणि मुख्य विक्रेता यांच्याकडे असतात. तरीही यासर्व यंत्रणा धुडकावून बिनदिक्कत गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत आहे. जास्तीचे पैसे दिल्यास या गोळ्या उपलब्ध होतात. या गोळ्यांसाठी काही जण थेट परराज्यातून डॉक्टरापर्यंत पोचत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मूळ विक्रेता बाजूला ठेवून यांची विक्री होत असल्याची माहिती पुढे येते. या गोळ्यांच्या किमती ग्राहकानुसार हजारो रुपयांत आहे.

सध्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्या मोकाट सुटल्याचे दिसून येते. पोलिसांकडून होणारी कारवाई, छापेसुद्धा कमी पडत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या विक्रीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे; कारण अधिकृत गर्भपात करता येतो, त्यासाठी ठोस कारण असावे लागते. ठरावीक हॉस्पिटलना याची परवानगी आहे. त्यासाठी आवश्‍यक गोळ्यांची विक्रीही नोंदणी करून होते. त्यावर औषध प्रशासनाचा वॉच असतो. तरीही छत्रपती संभाजीनगरात गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री खुलेआम होत आहे. त्यासाठी फक्त जास्त पैसे मोजावे लागतात.

कोणत्याही नोंदीशिवाय गोळ्यांची विक्री

सध्या बाजारात खुलेआम विक्री होत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या या थेट परराज्यातून येत असल्याचे सांगण्यात येते. या गोळ्यांची विक्री कोणत्याही अधिकृत विक्रेत्यांकडून होत नाही. यासाठी परराज्यातील विक्रेते थेट संपर्कात येतात आणि कोणत्याही नोंदीशिवाय या गोळ्यांची विक्री होते. ही विक्री जोपर्यंत थांबविली जात नाही तोपर्यंत अनधिकृत गर्भपात टाळणे शक्य नाही.

या कारणांसाठी करता येतो गर्भपात !

जर गर्भवती मा‍तेच्‍या जिवाला धोका असल्‍यास किंवा गर्भवती मातेला मानसिक किंवा शारीरिक आरोग्‍यास गंभीर इजा, दुखापत होत असल्‍यास.

जर नवजात बालकास जन्‍मानंतर मानसिक किंवा शारीरिक व्‍यंग असल्‍यास त्‍यामुळे बालकास अपंगत्‍व येणार असेल तर...

बलात्‍कारामुळे गर्भधारणा झालेली असेल तर (महिलेच्‍या मानसिक आरोग्‍याला जबर धक्‍का बसल्‍याचे गृहित धरून)

गर्भनिरोधक साहित्‍याच्‍या/औषधाच्‍या निष्क्रियतेमुळे गर्भधारणा झाल्‍यास.

कायद्यानुसार कुठे करता येतो गर्भपात ?

वैद्यकीय महाविद्यालय, जिल्‍हा रुग्‍णालय आणि प्रथम संदर्भ सेवा संस्‍था येथे २० आठवड्यापर्यंतचा गर्भ

ग्रामीण रुग्‍णालय, नोंदणीकृत पात्रता असलेले डॉक्‍टर व आवश्‍यक असलेले साहित्‍य यांच्याकडे १२ आठवड्यापर्यंत

प्राथमिक आरोग्य केंद्र, नोंदणीकृत व प्रशिक्षण असलेले डॉक्‍टर व आवश्‍यक असलेले साहित्‍य आणि गर्भपात सेवेच्‍या गुणवत्‍तेनुसार गर्भपात करू शकतात. ८ आठवड्यापर्यंतचा गर्भ

खासगी दवाखाने यांना जिल्हास्‍तरीय समितीच्‍या मान्‍यतेनुसार २० आठवड्यापर्यंत किंवा १२ आठवड्यापर्यंतचा गर्भ

कायद्याचे उल्‍लंघन केल्‍यास...

वैद्यकीय गर्भपात कायदा करणारी कोणतीही व्‍यक्‍ती ज्‍याची नोंदणी वैद्यकीय व्‍यावसायिक म्‍हणून नाही अशांना कमीत-कमी २ आणि जास्‍तीत-जास्‍त ७ वर्षापर्यंत सक्षम कारावास.

गर्भपात करणारी कोणतीही व्‍यक्‍ती जिच्या जागेस मान्‍यता नाही अशी व्‍यक्‍तीस कमीत कमी २ आणि जास्‍त ७ वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा.

मान्‍यता नसलेल्‍या जागेचा मालक, जेथे गर्भपात केला जातो अशा व्‍यक्‍तीस कमीत कमी २ वर्षे आणि जास्‍त ७ वर्षापर्यंत सश्रम कारावासास शिक्षेस पात्र आहे. (महिलेचा जीव वाचविण्‍यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्‍यावसायिकाकडून गर्भपात केला असेल व जागेची मान्‍यता नसेल, नोंदणीकृत वैद्यकीय व्‍यावसायिकाकडे आवश्‍यक असलेली गर्भपात करण्‍याकरिता कायदेशीर पूर्तता केली नसेल तर अशी व्‍यक्‍ती शिक्षेस पात्र ठरत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT