sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : आढाव दांपत्याच्या हत्येचा तीव्र निषेध ; उच्च न्यायालय वकील संघाने वाहिली श्रद्धांजली

राहुरी येथील ॲड. आढाव दांपत्याची हत्या झाली. याच्या निषेधार्थ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकील संघाने श्रद्धांजली अर्पण करून या घटनेचा तीव्र निषेध केला; तसेच काळ्या फिती लावून काम केले. यावेळी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राहुरी येथील ॲड. आढाव दांपत्याची हत्या झाली. याच्या निषेधार्थ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकील संघाने श्रद्धांजली अर्पण करून या घटनेचा तीव्र निषेध केला; तसेच काळ्या फिती लावून काम केले. यावेळी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

राहुरी येथील ॲड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा आढाव यांची निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ उच्च न्यायालय वकील संघाची तातडीने बैठक घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा व आरोपीला तत्काळ शिक्षा व्हावी, यासाठी गृहमंत्री, गृहसचिव व पोलिस महासंचालकांना निवेदन देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.

तसेच वकिलांवर होणारे वारंवार हल्ले रोखण्यासाठी व न्यायव्यवस्थेत सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करून घेण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा व बार कौन्सिल ऑफ इंडिया यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती करणारे पत्र पाठवण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला.

वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नरसिंह जाधव, ॲड. प्रशांत बोराडे, ॲड. अमोल जगताप, ॲड. अशोक राऊत, ॲड. जनाबाई आवटे, ॲड. दत्ता मडके यांनी ठराव मांडले. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नरसिंग एल. जाधव, ॲड. राधाकृष्ण के. इंगोले यांनी अनुमोदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT