छत्रपती संभाजीनगर

किमान पेन्शन साडेसात हजार रुपये द्या!

CD
पेन्शन साडेसात हजार रुपये द्या ! राष्ट्रीय संघर्ष समितीची मागणी छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः खासगी क्षेत्रात आयुष्यभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी अत्यल्प पेन्शन आणि महागाईच्या काळात होणारी परवड लक्षात घेता, ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे किमान ७,५०० रुपये व महागाई भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी संघर्ष केला जात आहे. खासगी क्षेत्रात २० ते ३० वर्षे नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना केवळ एक ते तीन हजार रुपये पेन्शन मिळते, जी या वाढत्या महागाईत कुटुंब चालवण्यासाठी अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे किमान साडेसात हजार रुपय पेन्शन मिळावी व महागाई भत्ता देण्यात यावा, यासाठी संघर्ष समिती काम करत आहे. पेन्शनधारकच नव्हे, तर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही या संघर्षात सामावून घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार आज आम्ही पेन्शनर आहोत, उद्या तुम्ही पेन्शनर होणार आहात, हा विचार करून कार्यरत कर्मचाऱ्यांनीही या लढ्यात सहभागी व्हावेस, असे आवाहन समितीने केले आहे. पेन्शनर पती-पत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी. योजनेत समाविष्ट नसलेल्यांना योजनेत सामावून घेऊन प्रतिमहिना ५००० रुपये पेन्शन देण्यात यावी. आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या असून, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये या राष्ट्रीय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. माहितीसाठी कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID Variant : कोरोनाचा नवा धोका? १८ देशांत पसरलेल्या PJ.2.1 व्हेरिएंटबाबत WHO चे मोठे अपडेट

EVM Controversy : पुण्यात डॉ. विजय चोरमारे लिखित ‘गाथा भारतीय निवडणुकांची’ पुस्तकाचे प्रकाशन; ईव्हीएम, मतदान प्रक्रिया आणि लोकशाहीवर शेलार,सपकाळ आमनेसामने

Women Safety : म्हैस कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहनावरील कारवाईच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; गोरक्षकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मेळघाटात प्रस्तावित अदानी समुहाच्या हजारो फूट उंचीवर असलेल्या प्रोजेक्टमध्ये घुसले ठाकरे गटाचे कार्यकर्ते

Gangapur News: मक्का-मदिनेच्या पवित्र यात्रेसाठी अमळनेरचे पठाण दाम्पत्य रवाना; ग्रामस्थांकडून सत्कार, शुभेच्छांचा वर्षाव

SCROLL FOR NEXT