छत्रपती संभाजीनगर

दोन दिवसांत दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

CD
परंड्यातील तरुणाची आत्महत्या ---- पुण्यात करीत होता ‘एमपीएससी’ची परीक्षेची तयारी --- पुणे, ता. ९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आर्थिक विवंचनेमुळे नारायणपेठेत गळफास घेतला, तर अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने कात्रजमध्ये इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५, मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून तो नारायणपेठेत स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. सततची आर्थिक टंचाई आणि कर्जामुळे प्रथमेश नैराश्यात होता. मागील काही महिन्यांपासून तो राहत असलेल्या खोलीचे भाडे थकले होते. जेवण व इतर खर्चासाठी त्याने ओळखीच्या लोकांकडून पैसे घेतले होते. परीक्षांचा अभ्यास करताना घेतलेल्या उसनवारीत त्याच्यावर अडीच लाखांचे कर्ज झाले. या परिस्थितीमुळे त्याने स्पर्धा परीक्षा सोडून गावी परत जाण्याचा विचारही काही मित्रांजवळ बोलून दाखविला होता. तत्पूर्वी, प्रथमेशने बुधवारी (ता. नऊ) खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमॉर्टम) ससून रुग्णालयात पाठविला आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट (चिठ्ठी) सापडली आहे. त्यामध्ये प्रथमेशने आर्थिक अडचणींचा आणि घेतलेल्या कर्जाच्या व्यवहारांचा उल्लेख केल्याचे पोलिसांनी सांगितले. ---- विद्यार्थिनीने संपवले जीवन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी (ता. आठ) इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. आदीमाया शेखर रेड्डी (वय २१, रा. फ्लॅट क्रमांक १००२, नॅन्सी लेक होम सोसायटी, कात्रज; मूळ रा. तेलंगण) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिने अभ्यासाच्या ताणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदीमाया ही मूळची हैदराबादमधील असून, पुण्यात एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. मंगळवारी ती राहत असलेल्या कात्रजमधील नॅन्सी लेक होम सोसायटीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक रवी जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिचा भावाकडे विचारपूस केली असता, दोघेही बहीण-भाऊ कात्रज परिसरात एकत्र राहत असल्याचे त्याने सांगितले. परीक्षेचा ताण आल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती भावाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT