Vaijapur Government hostel sakal
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Government hostel : विद्यार्थिनींच्या जेवणात निघाले किडे,वैजापुरातील शासकीय वसतिगृहातील मुलींच्या जिवाशी खेळ

Vaijapur Government hostel : वैजापुरातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी जेवणात किडे आढळल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणात समाजकल्याण विभागाने ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर : येथील शासकीय वसतिगृहातील मुलींना देण्यात आलेल्या जेवणात किडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता. दहा) उघडकीस आला.

वसतिगृहातील मुलींनी आपल्या जिवाशी खेळ सुरू असल्याच्या या धक्कादायक प्रकाराची तक्रार तहसीलदार सुनील सावंत यांच्याकडे केली आहे. वैजापूर शहरालगत शिवराई रोडला मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात ठेकेदारामार्फत मुलींच्या जेवणाची व्यवस्था केली जाते.

मात्र, काही दिवसांपासून जेवणात किडे आढळून येत असल्याबाबत मुलींनी वसतिगृहातील यंत्रणेकडे माहिती दिली, पण कुठलीही सुधारणा झाली नाही. यामुळे अखेर गुरुवारी दुपारी मुलींनी तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांकडे आपली व्यथा मांडली असता, तहसीलदार सावंत यांनी छत्रपती संभाजीनगरच्या समाजकल्याणच्या आयुक्तांशी संपर्क साधत त्यांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर सहायक आयुक्तांनी तातडीने वसतिगृह गाठून या प्रकरणाची चौकशी केली. यावेळी मुलींनी समस्या मांडल्या.

दोन महिन्यांपासून विद्यार्थिनी त्रस्त

दोन महिन्यांपासून किडे निघण्याचा प्रकार घडत होता. मात्र, याबाबत अनेकदा मुलींनी तक्रार करूनही त्यावर कुठलाही पर्याय अथवा कारवाई करण्यात आली नाही, असे विद्यार्थिनींनी सांगितले.

दोन महिन्यांपासून विद्यार्थिनी त्रस्त

दोन महिन्यांपासून किडे निघण्याचा प्रकार घडत होता. मात्र, याबाबत अनेकदा मुलींनी तक्रार करूनही त्यावर कुठलाही पर्याय अथवा कारवाई करण्यात आली नाही, असे विद्यार्थिनींनी सांगितले.

शासकीय वसतिगृहातील मुलींची समस्या जाणून घेतली आहे. जेवणाबाबत त्यांची तक्रार आहे. काही मुलींच्या जेवणात किडे आढळले. या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराला लेखी पत्र देऊन खुलासा मागवून योग्य ती कारवाई केली जाईल.

- प्रदीप भोगले, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: एकाच महिन्यात महिलेचे तीनदा लग्न; बळजबरीमुळे कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न, पुण्यातून चालतंय लग्नाचं रॅकेट

Latest Marathi News Live Update : उद्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनसेचा 20 वा वर्धापन दिन!

LPG Cylinder Booking Rules : सरकारने घरगुती LPG बुकिंगचे नियम बदलले, आता २१ दिवसांपूर्वी बुक होणार नाही दुसरा सिलिंडर, कारण काय ?

अमृता खानविलकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज! सुरु केला नवीन प्रवास, चाहत्यांना दिल 'खास' सप्राईज

Kolhapur College Crime: इंजिनियरींगच्या ५ विद्यार्थिनींना प्राध्यापकाने केबीनमध्ये बोलवलं अन् घडलं भयानक; कोल्हापूरमध्ये प्रकार

SCROLL FOR NEXT