छत्रपती संभाजीनगर

उच्चशिक्षित तरूणाने शेतीचा मार्ग पत्करत मिळविले आर्थिक स्थेर्य

CD
(दसरा विशेष पान) -- धाराशिव ः बाजारात पाठविण्यासाठी कोथिंबिरीच्या जुड्या बांधताना बाळासाहेब धाबेकर (उजवीकडून). --- उच्चशिक्षिताने धरला शेतीचा मार्ग --- प्रयोगशीलतेतून बाळासाहेब धाबेकरांनी मिळविले आर्थिक स्थैर्य --- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २० ः एकीकडे प्रतिकूल हवामान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असतानाच, धाराशिव तालुक्यातील दुधगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिद्द, आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत यश मिळवून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता, निरोगी, समाधानी आयुष्य जगण्यासाठी स्वतःची शेती फुलविण्याचा यशस्वी मार्ग त्यांनी निवडला आहे. बाळासाहेब धाबेकर असे त्यांचे नाव आहे. त्यांनी एम.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर नोकरीचा मार्ग न पत्करता त्यांनी आपली साडेपाच एकर जमीन स्वतः कसण्याचा निर्णय घेतला. या साडेपाच एकरांपैकी अर्धा एकर (२० गुंठे) क्षेत्रावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या २० गुंठ्यांच्या क्षेत्रात ते आंबा, मिरची, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो यांसारखी फळे आणि भाजीपाल्याची पिके आळीपाळीने घेतात. --- असे मिळते वार्षिक उत्पन्न बाळासाहेब धाबेकर हे स्वतः भाजीपाल्याची थेट विक्री करण्यावर भर देतात. सध्या ते स्वतः कोथिंबिरीची विक्री करत असून, त्यांना शेकडा दीड हजार रुपये असा चांगला दर मिळत आहे. केवळ या २० गुंठ्यांच्या भाजीपाला व फळबागेच्या क्षेत्रातून त्यांना वर्षाला सुमारे तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. ---- सूक्ष्म सिंचनाचा वापर उरलेल्या जमिनीवर ते पारंपरिक सोयाबीन, गव्हाचे पीक घेतात, ज्यातून त्यांना वर्षाला सुमारे एक लाखाचे उत्पन्न मिळते. संपूर्ण शेतीसाठी ते सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) पद्धतीचा काटेकोर वापर करतात. त्यातून ते पाण्याची बचत साधतात. ‘योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्द असेल तर शेतीतूनही उत्तम उत्पन्न मिळवता येते’ हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. ........ फोटो क्रमांक ःOSM26B07237

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"आम्हाला पक्षाचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा सिंहासनावर बसवायचे आहे"; शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान!

रामराज्य म्हणजे नेमकं काय? विजयादशमीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

SCROLL FOR NEXT