शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते राज्यातील कायदा-सुव्यवस्थेपर्यंत अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दिलासा नसून त्यांची थट्टा असल्याची टीका त्यांनी केली. पीक पंचनामे, रखडलेली कर्जमाफी, नमो किसान योजनेची अपूर्ण अंमलबजावणी आणि केंद्राच्या पथकाच्या कामावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.