छत्रपती संभाजीनगर

साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण ढोकीत खासदार, आमदारांच्या फोटोंचा फ्लेक्स चर्चेत

CD
साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण ढोकीत खासदार, आमदारांच्या फोटोंचे फ्लेक्स चर्चेत ढोकी, ता. ८ (बातमीदार) ः जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तेरणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील खासदार आणि चार आमदारांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले असून, या मागणी पत्राचा ढोकी येथील बसस्थानक चौकात उभारलेला मोठा डिजिटल फ्लेक्स पाहून चर्चेला उधाण आले आहे. कोल्हापूर-सांगलीच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यात ऊस दरात प्रतिटन तब्बल ७०० ते ८०० रुपयांची तफावत असते. हे आर्थिक शोषण वर्षानुवर्षे सुरू असून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येमागे हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे शेतकऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे. या शोषणाविरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून आपली मतदारांप्रती असलेली बांधिलकी दाखवून द्यावी, असे स्मरण पत्रातून करून देण्यात आले आहे. हे निवेदन मंगळवारी (ता. सहा) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार तानाजी सावंत यांच्या अधिकृत मेलवर पाठवण्यात आले आहे. ढोकी चौकातला हा बोर्ड येण्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असून, तेरणा परिसरात सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. या निवेदनावर सुधाकर पाटील, दत्ता कोकाटे, दत्तात्रय देशमुख, गोरोबा डांगे, सुरेश समुद्रे, उत्तम वाकुरे आणि श्यामराव देशमुख यांच्यासह २३ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ...... ढोकी ः साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनाचे लावलेले फ्लेक्स. ..... फोटो क्रमांक ः OSM26B07141

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT