छत्रपती संभाजीनगर

पान १ साठी

CD
साडेआठ एकर ऊस जळून खाक बीड, घाटनांदूर, ता. १७ (बातमीदार) ः जिल्ह्यात उसाला आग लागण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल साडेआठ एकर ऊस जळून खाक झाला आहे. आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव आणि परळी तालुक्यातील आनंदवाडी शिवारात या दुर्दैवी घटना घडल्या असून, ऐन तोडणीला आलेले पीक डोळ्यांदेखत जळून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पहिली घटना आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे गुरुवारी (ता. १५) सायंकाळी घडली. शेतातील जीर्ण विद्युत तारांचे घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे बाबासाहेब गिरे आणि शंकर झगडे यांच्यासह तीन शेतकऱ्यांचा सुमारे साडेचार एकर ऊस जळाला. गावकऱ्यांनी धाव घेत आग विझवल्याने अनर्थ टळला. यात अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रार केली आहे. तसेच तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दुसरी घटना परळी तालुक्यातील आनंदवाडी शिवारात शनिवारी (ता. १७) दुपारी घडली. लाडझरी येथील रंजना कांदे यांच्या शेतातील उसाला अचानक आग लागल्याने चार एकर ऊस भस्मसात झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परळी येथील अग्निशमन दल आणि आनंदवाडी व लाडझरी येथील ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. या दोन्ही घटनांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT