दोन एकरावरील ऊस
‘शॉर्टसर्किट’ने खाक
दहिफळ, ता. १७ (बातमीदार) : कळंब तालुक्यातील दहिफळ येथे शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी अंजली ढवळे यांच्या गट क्रमांक ५५६ मधील जवळपास दोन एकर ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत त्यांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतीची मशागत, खते, औषधे, सिंचन आणि मजुरीसाठी लाखो रुपये खर्च करून ढवळे यांनी उसाचे पीक उभे केले होते. मात्र, शनिवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत दोन एकर ऊस डोळ्यांदेखत जळून खाक झाला. ऐन काढणीच्या किंवा उत्पन्नाच्या तोंडावर उभे पीक जळाल्याने या शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
शेतशिवारातील जीर्ण झालेल्या आणि लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. वीजवाहिन्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न शेतकरी, ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या आगीला महावितरणचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
........
((चौकट))
पंचनामा करून तत्काळ मदत द्या
महसूल, कृषी विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा. दोषींवर जबाबदारी निश्चित करून महावितरणकडून योग्य नुकसानभरपाई मिळावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ढवळे यांनी केली आहे.
........
दहिफळ ः कळंब तालुक्यातील दहिफळ येथे शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी अंजली ढवळे यांच्या शेतातील जळालेला ऊस.
फोटो क्रमांक ः OSM26B07220
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.