छत्रपती संभाजीनगर

ऊस तोडण्यांमुळे दुष्काळात वाढ्याचा ‘गोड’ आधार

CD
OSM26B07353 धाराशिव ः कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरी हनुमंत सोमासे यांनी ऊसतोड झाल्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी गंजी लावून साठवून ठेवलेले वाढे. --- ऊस तोडण्यांमुळे दुष्काळात वाढ्याचा ‘गोड’ आधार ------ पशुपालकांकडून साठवणुकीवर भर; प्रतिशेकडा ४०० ते १००० रुपयांना खरेदी --- सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. ८ : जिल्ह्यात सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, ठिकठिकाणी ऊस तोडणीच्या कामांनी वेग घेतला आहे. भीषण चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा गळीत हंगाम शेतकरी आणि पशुपालकांसाठी मोठा दिलासा ठरू लागला आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या उसाच्या वाढ्याला मोठी मागणी वाढली असून, पशुपालक थेट शेतात जाऊन किंवा घरपोच वाढे खरेदी करत आहेत. यंदा जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. आगामी जानेवारीअखेरपर्यंत म्हणजेच पुढील साधारण तीन महिने हा हंगाम चालण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तोपर्यंत पशुपालकांना हिरवा चारा म्हणून उसाच्या वाढ्याचा पुरवठा होत राहणार आहे. ----- जागेवर ४०० ते ५००, तर घरपोच १००० रुपये दर उसाच्या वाढ्याला सध्या मोठी मागणी असल्याने दरातही तेजी पाहायला मिळत आहे. ऊसतोडणीच्या ठिकाणी थेट शेतात जाऊन खरेदी केल्यास वाढ्याच्या पेंडीला प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपये दर द्यावा लागत आहे. स्वतः वाहतूक करण्याचा त्रास वाचविण्यासाठी थेट गोठ्यापर्यंत वाढे हवे असल्यास प्रतिशेकडा ९०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. असे असले तरी भविष्यात पावसाळ्यापर्यंत जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी यासाठी पशुपालक वाढे खरेदी करून त्याची गंजी लावून साठवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. -------- ((कोट)) माझ्याकडे चार-पाच जनावरे असून, पावसाळ्यापर्यंत त्यांच्या चाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. सोयाबीनचे कुटार आधीच साठवून ठेवले आहे. आता प्रतिशेकडा एक हजार रुपये दराने घरपोच उसाचे वाढे खरेदी करून साठविले आहेत. थेट शेतात ५०० रुपयांना मिळतात, पण वाहतुकीचा खर्च आपल्यालाच करावा लागतो. - अमोल माळी, पशुपालक, भूम ------- ((कोट)) माझा एक एकर ऊस नुकताच तुटला आहे. शेतातील सर्व वाढे एकत्र करून मी त्याची गंजी लावून ठेवली आहे. स्वतःच्याच जनावरांना चाऱ्याची अत्यंत गरज असल्याने इतर पशुपालकांकडून मागणी असूनही मी वाढ्याची विक्री केली नाही. - हनुमंत सोमासे, शेतकरी, शिराढोण (ता. कळंब) ----- ((कोट)) उसाचे वाढे सध्या दुष्काळी स्थितीत जनावरांसाठी मोठा आधार ठरत आहेत. पुढील तीन महिने गळीत हंगाम सुरू राहणार असल्याने पशुपालकांना हिरवा चारा सहज उपलब्ध होत राहील. - श्रीराम साळुंके, कार्यालयीन अधीक्षक, नॅचरल शुगर कारखाना, रांजणी (ता. कळंब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharigaon Court Attack : न्यायालयाच्या आवारात महिलेचा राडा; न्यायाधीश, सरकारी वकील अन् पोलीस कर्मचाऱ्यावर केला लोखंडी सळईने हल्ला

IND A vs NZ A, Test: जैस्वालच्या शतकानंतर सुदर्शन, जुरेल अन् तिलक वर्माचा न्यूझीलंडला दणका; भारताच्या साडेचारशे धावा पार

“सिनेमातून काढलं, धमक्यांचे फोन आले...” विवेक ओबेरॉयच्या करिअरमध्ये असं काय घडलं की निर्मातेही घाबरू लागले?

Diwali 2026: नरक चतुर्दशीला कारिट फोडण्याची काय आहे प्रथा? जाणून घ्या या परंपरेमागचा अर्थ

MLA रेस्ट हाऊसमध्ये अनोळखी तरुण-तरुणी घुसले, काँग्रेस आमदाराने दार उघडताच आक्षेपार्ह अवस्थेत दिसले; राजकारणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT